Nana Patole : ठाकरे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
उद्धव ठाकरे वरील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नाना पटोले यांनी खंडन केलं आहे. जागावाटपावर चर्चा मात्र झाली.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे वरील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नाना पटोले यांनी खंडन केलं आहे. जागावाटपावर चर्चा मात्र झाली.
Nana Patole News :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटी घेतली आहेत. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. परंतु मुख्यमंत्रीपद कुणाला दिलं जाणार यावर चर्चा झाल्याच्या बातम्यांचं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खंडन केलं आहे.
नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलं की या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यात आली नाही, केवळ निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असंही त्यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT