एग्जिट पोल

Eknath Shinde : दिघेंच्या आनंद आश्रमातील पैशांची उधळपट्टीवर मुख्यमंत्री म्हणाले, ''पदाधिकाऱ्यांना पक्षातून...''

मुंबई तक

ADVERTISEMENT

ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळण्याच्या व्हिडीओवर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी कडक उपाययोजना घेण्याचे आदेश दिले आहेत.

social share
google news

Eknath Shinde News : ठाण्यातील टेंभी नाका येथे असलेल्या आनंद दिघे यांच्या आश्रमात नोटा उधळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. गणपती विसर्जनदरम्यान ढोल वाजवणाऱ्यांवर नोटा उधळल्याचे दृश्य या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर बोलताना शिंदे यांनी म्हटले की, असा प्रकार घडू नये याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. त्यांनी या घटनेवर आपली नाराजी व्यक्त केली आणि काही कडक उपाययोजना घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT