Kasba Peth By Poll : हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर; कोणाची किती संपत्ती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kasba Peth By Poll : पुणे : कुठल्याही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर आपल्या उमेदवारांची संपत्ती नेमकी किती यावर सगळ्यांचं लक्ष असतं. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत उमेदवारांच्या संपूर्ण संपत्तीचा उलगडा होतोच. कसबा निवडणुकीसाठी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपच्या हेमंत रासने यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघांचीही संपत्ती पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Congress’ […]

social share
google news

हेमंत रासनेंची किती आहे संपत्ती?

शपथपत्रात दिलेल्या महितीनुसार हेमंत रासनेंची एकूण संपत्ती ही 17 कोटी रुपये एवढी आहे. रासनेंचं 2022-23 या वर्षाचं उत्पन्न हे पाच लाख 75 हजार चारशे दहा रुपये आहे. तर त्यांच्या पत्नी मृणाली रासनेंचं वार्षिक उत्पन्न चार लाख 30 हजार 830 रुपये असुन त्यांचा मुलगा निधेय रासनेचं वार्षिक उत्पन्न 3 लाख 17 हजार 430 रुपये आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हेमंत रासनेंची जंगम मालमत्ता :

रासनेंकडे असणारी जंगम मालमत्ता एक कोटी 82 लाख 81 हजार 362 तर त्यांच्या पत्नींच्या नावावर 27 लाख 59 हजार 357 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रासनेंच्या मुलीच्या नावावर 8 हजार 423 तर  मुलाच्या नावे 2 लाख 77 हजार 578 रुपयांची जंगम मालमत्ता.

हे वाचलं का?

हेमंत रासनेंची स्थावर मालमत्ता :

हेमंत रासनेंच्या नावावर 2 कोटी 67 लाख 59 हजार 92 रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्या पत्नीच्या नावावर 1 कोटी 81 लाख 14 हजार 495 रुपयांची आहे. मुलीच्या नावे 43 लाख 25 हजार तर मुलाच्या नावे 1 कोटी 33 लाख 59 हजार 533 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

यासोबतच हेमंत रासनेंच्या नावे 3 कोटी 55 लाख 63 हजार 414 रुपयांचं कर्ज तर त्यांच्या पत्नींच्या नावे 24 लाख 93 हजार 263 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर तुम्हाला का वाटतं एवढी मालमत्ता असणारे हेमंत रासने रवींद्र धंगेकरचा पराभव करतात की धंगेकर रासनेंचा पराभव करतात हे आम्हाला कंमेट करुन नक्की कळवा त्यासोबतच

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT