लालबागचा राजा: नवसाच्या रांगेत सामान्य भाविकांना धक्काबुक्की, Video viral

मुंबई तक

ADVERTISEMENT

Lalbaugcha Raja Darshan: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने आलेल्या सामान्य भाविकांना गार्डकडून धक्काबुक्की होते आहे.

social share
google news

मुंबई: दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत असतात. तासनतास नाही तर अनेकदा दिवस रात्र लोक रांगेत थांबतात बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. सध्या लालबागच्या राजाच्या मंडपातील काही दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होतायत. एक रांग व्हीआयपी आणि दुसरी रंग सामान्य तासनतास रांगेत उभ राहून दर्शन घेणाऱ्यांची. सामान्य रांगेतून येणाऱ्या भाविकांना गार्डकडून धक्का बुक्की केली जातीय. लाईन पटपट पुढे जावी म्हणून बाऊन्सर अक्षरशः त्यांना ढकलतात. तर दुसरीकडे व्हीआयपी रांगेतील लोक सेल्फी आणि फोटो काढण्यात व्यस्त आहेत. बाप्पाच्या दरबारात असा भेदभाव होताना बघून भाविकांना नाराजी व्यक्त करायची आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आम्ही सामाजिक समानतेची आणि धार्मिक संस्कृतीची जपणूक करावी हीच इच्छा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT