लक्ष्मण पवार हाती घेणार तुतारी? कार्यकर्त्यांची मागणी, बीडच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट!

मुंबई तक

ADVERTISEMENT

लक्ष्मण पवार यांनी येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाची साथ सोडल्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

social share
google news

आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी येऊ घातलेली निवडणूक लढविणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पवार समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी सकाळपासून पवारांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या घातला आहे. दोन तासानंतर लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली. कार्यकर्त्यांना पंधरा दिवसांचा अवधी पवार यांनी मागितला असून त्यानंतर निर्णय घेणार असल्याचं सांगितले आहे. यावेळी आमदार पवारांनी पक्षातील नाराजी बोलून दाखविल्याने कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT