नांदेडमध्ये फेसबुक पोस्टवरून जोरदार राजकीय वाद
नांदेडच्या लोहा शहरात फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टवरून ठाकरे गटाचे व सेवा जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
ADVERTISEMENT
नांदेडच्या लोहा शहरात फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टवरून ठाकरे गटाचे व सेवा जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
नांदेडच्या लोहा शहरात फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टवरून मोठा वाद उद्भवला आहे. ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवार आणि सेवा जनशक्ती पार्टीचे प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. लोहा येथे शिवसेनेचा मेळावा असणार असून खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. परंतु मेळाव्यापूर्वीच राजकीय वातावरण तापलेले आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर ताशेरे ओढत आहेत त्यामुळे लोहा शहरात तणाव निर्माण झाला आहे. एकनाथ पवार यांच्या कार्यालयात तसेच मेळाव्याच्या ठिकाणी मनोहर धोंडे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घडामोडींमुळे लोहा शहरात घबराट आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT