Raj Thackeray : श्रीसेवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? | Maharashtra Bhushan | Appasaheb Dharmadhikari
Raj Thackeray on maharashtra bhushan puraskar tragedy Appasaheb Dharmadhikari

ADVERTISEMENT
Raj Thackeray on maharashtra bhushan puraskar tragedy Appasaheb Dharmadhikari
श्री सद्गुरू परिवाराचे सर्वेसर्वा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना काल (16 एप्रिल) नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, हा पुरस्कार सोहळा भर उन्हात पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो श्री सदस्य आले होते. पण उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघात यामुळे साधारण 100 जणांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने यातील 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 25 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे. आता याच प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तब्बल 24 तासांनंतर ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray on maharashtra bhushan puraskar tragedy Appasaheb Dharmadhikari