खासदार सुप्रिया सुळे यांनी घेरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी रूपाली चाकणकर मैदानात
Rupali Chakankar in Maidan for Deputy Chief Minister Ajit Pawar after being cornered by MP Supriya Sule

ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसने 70 हजार कोटींचा घोटाळा केलाय, असं एक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीची दोन शकलं झाली. शिखर बँक घोटाळ्यावरून ज्या अजित पवारांना घेरलं जातं, तेच भाजपसोबत गेले. मग सुप्रिया सुळेंनी मोदींच्या विधानावर बोट ठेवलं अन् एकाच दगडात दोन पक्षांना लक्ष्य केलं. एक अजित पवार आणि दुसरं भाजपा. सुप्रियांनी चौकशीच करण्याची विनंती करत कोंडी केली. त्यावरूनच अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी पलटवार केलाय. नेमकं काय झालंय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया…