खोतांवर पलटवार, फडणवीसांना घेरलं, पवारांवरील त्या वक्तव्यानंतर विलास लांडे प्रचंड संतापले!
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर वादग्रस्त विधान केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विलास लांडे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

ADVERTISEMENT
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शरद पवार, अजित पवार यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे वातावरण पेटले असून, भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात सदाभाऊ खोत यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीमध्ये त्यांनी खोत यांचा भाजपच्या समर्थक म्हणून आरोप केला आहे. विलास लांडे यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की सदाभाऊ खोत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अटक करण्यात यावी.