शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्यावर जयदीप आपटे यांची पहिली प्रतिक्रिया
शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर कोसळला. जयदीप आपटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT
राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदलाच्या वतीने उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं कंत्राट हे मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. याचे प्रोप्रायटर आणि शिल्पकार जयदीप आपटे आहेत तर स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांनी काम पाहिले होते. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे जयदीप आपटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी या घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.