Thane Rain Update: धोक्याची घंटा वाजली, तरीही ओसंडून वाहणाऱ्या पुलावरुन थेट गाडी...

मुंबई तक

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यातील एका पुलावर पाणी ओसंडून वाहत असताना एका दुचाकी चालकाने रिस्क घेतली आहे.

social share
google news

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. आज पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात जोरात पाऊस सुरु आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईत बरसत असलेल्या पावसाचा जोर आज खूपच जास्त आहे. या सरींची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर गटार आणि डोंगराळ भागातील माती आणि राडारोडा रस्त्यावर वाहून येत आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी साचलं आहे. पावसाच्या तिव्रतेमुळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. अशातच ठाण्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ठाण्यातील एका पुलावर पाणी ओसंडून वाहत असतानाच एका दुचाकी चालकाने थेट दुचाकी पुलावरुन घातली आहे. दुचाकी चालक डबल सीट दुचाकी चालवत असाताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. धोक्याची घंटा समोर दिसत असताना पण या दुचाकी चालकाने रिस्क घेतली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT