उद्धव ठाकरे गटाचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप, दोन पानी पत्रात काय म्हटलंय?

मुंबई तक

Uddhav Thackeray group’s serious accusation against Rahul Narvekar, what is said in the two-page letter?

ADVERTISEMENT

google news

सुप्रीम कोर्टाने ३१ डिसेंबरची डेडलाईन दिल्यानंतर शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरील सुनावणीला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरच गंभीर आरोप केलाय. पूर्वग्रहामुळे विधानसभा अध्यक्ष अवलंबत असलेली पद्धत पक्षपाती आहे, असा थेट आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय..