संदीपान भूमरे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये वाद का झाला?
ग्रमदैवत गणपतीच्या मंचावर संदीपान भूमरे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये वाद झाला.

ADVERTISEMENT
ग्रमदैवत गणपतीच्या मंचावर संदीपान भूमरे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये वाद झाला.
ग्रामदैवत गणपतीच्या मंचावर माजी महापौर नंदकुमार घोडेलेंनी चंद्रकांत खैरेंचं नाव आधी घेतल्यामुळं संदीपान भुमरेंचा पारा चढला. खैरे, दानवे आणि कराडांसमोर सरकारी प्रोटोकॉलची आठवण करून देताना भुमरेंचा आवाज चढला. रोखण्याचा प्रयत्न केला असताना भुमरेंनी 'ए बोलायचं नाही' असं म्हणत चंद्रकांत खैरेंना सुनावलं. हा सगळं राजकीय भांडण होत असताना केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मंचावरच होते. 'मंत्री असेल किंवा खासदार असेल, ज्याचा त्याचा मान राखला गेला पाहिजे', असा मुद्दा मांडून, सावरून घेताना दानवेंनी खैरेंना चिमटे काढले. तर 'गणरायाने राजकीय नेत्यांना सद्बुद्धी द्यावी', असं म्हणत भागवत कराडांनी संदीपान भुमरेंना कोपरखळी लगावली.