विनायक मेटे अपघात : ट्रक चालकाला पालघर पोलिसांनी कसं शोधलं?, तो ट्रक कुठे गेला?
शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. मेटेंच्या अपघाती मृत्युवरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असून, आता अपघातात ज्या ट्रकवर विनायक मेटेंची गाडी जाऊन धडकली. त्या ट्रक चालकाला अटक करण्यात पोलिसांनी यश आलंय. रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर आणि मोठ्या शोधाशोधीनंतर पालघर पोलिसांनी ट्रक चालकाला ट्रकसह दमणमध्ये जाऊन ताब्यात घेतलं. […]
ADVERTISEMENT

शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. मेटेंच्या अपघाती मृत्युवरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असून, आता अपघातात ज्या ट्रकवर विनायक मेटेंची गाडी जाऊन धडकली. त्या ट्रक चालकाला अटक करण्यात पोलिसांनी यश आलंय. रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर आणि मोठ्या शोधाशोधीनंतर पालघर पोलिसांनी ट्रक चालकाला ट्रकसह दमणमध्ये जाऊन ताब्यात घेतलं.
आमदार विनायक मेटे यांच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (यशवंतराव चव्हाण महामार्ग) गाडीचा रविवारी (१४ ऑगस्ट) पहाटे अपघाती मृत्यू झाला. विनायक मेटेंसह गाडीत तिघे होते. यात गाडी चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र त्यांचा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. या अपघातात विनायक मेटे जागीच गतप्राण झाले.
विनायक मेटेंच्या गाडीने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याचं पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं होतं. विनायक मेटे यांची गाडी ज्या ट्रकवर जाऊन आदळली, त्या ट्रक चालकाला शोधण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत.
मुंबईतील भाजीपाला विक्रेता ते 5 वेळा आमदार; असा होता बीडच्या विनायक मेटेंचा संघर्षमय प्रवास