Mumbai Tak /बातम्या / Love trauma syndrome : ब्रेकअपनंतर होणारा आजार… अक्षरशः मोडून पडतात लोकं
बातम्या

Love trauma syndrome : ब्रेकअपनंतर होणारा आजार… अक्षरशः मोडून पडतात लोकं

Love trauma syndrome :

प्रेम म्हणजे सजीव प्राण्याला मिळालेली एक निरायम भावना. मनुष्य असो की प्राणी, प्रत्येक जण कोणावर तरी प्रेम करत असतो, आधार, पाठिंबा शोधत असतो. असं म्हणतात की, प्रेमात असतो तेव्हा आपल्या जगण्याच्या पद्धती बदलतात. आपल्या जोडीदाराच्या बरोबरीने आपण एका सुंदर स्वप्नासारखे आयुष्य जगत असतो. जगातील सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट वाटू लागते.

पण कधी कधी अशी वेळ येते की जगातील सर्वात जास्त आनंद देणारी ही गोष्ट सर्वात जास्त दुःख देऊन जाते. प्रेमात असा काही टर्निंग पॉईंट येतो जिथं हे सुंदर नातं अखेरच्या घटका मोजायला लागत. ज्याच्यासोबत साथ देण्याची शपथ घेतलेली असते ते हात हळू हळू सुटायला लागतात. याच गोष्टीला आजच्या काळात ब्रेकअप असं म्हणतात. (What exactly is love trauma syndrome? What is this disease? And the way to save yourself from it)

प्रेम माणसाला जितकी उर्जा देते ब्रेकअप तितकचं रितेपण देतं. ब्रेकअपनंतर वेळेनुसार काही लोकं सावरतात. पण सर्वांजवळचं हा प्रॅक्टिकल दृष्टीकोन असतोच असं होतं नाही. अनेकांसाठी ब्रेकअप हा मनावर मोठा आघात करणारा असतो. नातं तुटण्याचं दु:ख त्यांना आतून अक्षरशः मोडून टाकतं. त्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात मोठे बदल होतात.

मानसशास्त्रज्ञांच्या मते हा एक गंभीर आजार आहे. याला लव्ह ट्रॉमा सिंड्रोम असं म्हणतात. पण नेमका काय आहे हा आजार? आणि यापासून स्वतःला वाचवण्याचा मार्ग काय आहे हे आपण येथे जाणून घेऊया.

23 वर्षांपूर्वी लव्ह ट्रॉमा सिंड्रोम समोर आला. इमोशनल ब्रेकडाऊन विषयात विशेष प्राविण्य मिळविणारे मानसोपचारतज्ज्ञ रिचर्ड रॉस यांना याचं श्रेय जातं. त्यांनी 1999 मध्ये लव्ह ट्रॉमा सिंड्रोमचे मॉडेल विकसित केलं. यात त्यांनी प्रेमाचे नातेसंबंध तुटल्यानंतरच्या परिस्थितीबद्दल सखोलपणे विश्लेषण केलं आहे.

सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. अनिल शेखावत सांगतात, या सिंड्रोममध्ये डॉ. रॉस यांनी प्रेमसंबंध तुटल्यानंतर लोकांमध्ये दिसणाऱ्या अशा अनेक गंभीर लक्षणांबद्दल सांगितलं. हे सिंड्रोम अनेक लोकांमध्ये दीर्घकाळ टिकून राहतात, एवढचं नाही तर हे सिंड्रोम लोकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील कामगिरीवरही परिणाम करतात.

Ratan Tata ही पडलेले प्रेमात… पण का नाही केलं लग्न?

लव्ह ट्रॉमा सिंड्रोमचे चार पैलू :

1. भावना उचंबळून येणं :

या सिंड्रोमच्या अभ्यासात, लोकांमध्ये नैराश्येचा भावना उचंबळून येतात. एकाच वेळी सगळ्या भावनांना सामोरं जाणं कठीण आहे, असं या लोकांना सतत असं वाटतं राहतं. ते सतत विविध भावनांच्या महासागराने वेढलेले असतात.

2. उपेक्षेपणाची भावना :

यामध्ये माणसाच्या मनात उपेक्षेची भावना दाटून येते. त्यांना प्रत्येकवेळी दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं. एकटेपणा, निराशा आणि दुःख या गोष्टींनी त्यांना घेरलेलं असतं.

3. मानसिक अफवा :

यात मनातील विचार अचानक खूप सकारात्मक तर कधी खूप नकारात्मक होतात.

4. भावनिक असंवेदनशीलता :

कधीकधी लोकांमध्ये भावनिक असंवेदनशीलतेची भावना येते. यालाच मानसशास्त्रीय भाषेत भावनिक ऍनेस्थेसिया म्हणतात. लोकांमध्ये मनात रितेपणाची भावना दाटून येते. त्यांच्यात कोणत्याच भावना उरल्या नाहीत, असं सतत त्यांना वाटतं राहतं.

ब्रेकअपचा प्रभाव सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत :

प्रेमात अपयश म्हणा किंवा ब्रेकअप… अभ्यासात असं आढळून आलं आहे की त्याच्या परिणाम सहा महिन्यांपासून २ वर्षांपर्यंत कायम राहतो. या कालावधीत, पीडित व्यक्तीमध्ये वर उल्लेख केलेली सर्व लक्षण आढळून येतात. डॉ.अनिल शेखावत सांगतात की, या भावना यापेक्षा जास्त काळ राहिल्या तर समुपदेशन खूप महत्त्वाचं ठरतं.

‘सोशल वर्कर’च्या प्रेमात पडली महिला IPS, अशी आहे Love Story…

अपयशाची भावना – ब्रेकअप झाल्यानंतर अपयशाची भावना व्यक्तीमध्ये दीर्घकाळ राहते. त्यांना वाटते की ते प्रेमात अयशस्वी झाले आहेत, यापुढेही असंच होतं राहिलं.

विरुद्ध लिंगाबद्दल तिरस्कार – अनेक व्यक्तींना त्यांच्या विरुद्ध लिंगाबद्दल किंवा ते ज्यांच्या प्रेमात पडले त्यांच्याबद्दल पूर्णफणे लैंगिक तिरस्कार वाटतो. तसंच विभक्ततेच्या चिंतेपासून हळूहळू ही भावना नैराश्यापर्यंतच्या पातळीवर जाते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो.

ब्ल्यू बिकिनी आणि कट टी-शर्टमध्ये ‘Middle Class Love’ स्क्रिनिंगला आली उर्फी जावेद

माफी करण्याची उपचारपद्धती :

लव्ह ट्रॉमा सिंड्रोममधून बाहेर पडण्यासाठी माफ करणे आणि विसरणे या उपचार पद्धतीचा अभ्यास केला आहे. कटुतेने तुटलेल्या नात्यात अनेकदा राग आणि आत्मविश्वास, स्वाभिमानाला ठेच पोहचल्याची भावना तयार होते. विश्वास तोडल्याचा, विश्वासाचा गैरफायदा घेतल्यानं लोक एकमेकांना माफ करत नाहीत.

डॉ. शेखावत म्हणतात की डॉ. रॉस यांनी त्यांच्या अभ्यासात माफीला उपचार पद्धतीमध्ये समाविष्ट केलं आहे. अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती डॉक्टरांकडे जातात, तेव्हा त्यांची पहिली तक्रार असते की त्याच्यावर अन्याय झाला. त्यांच्याशी चुकीच वागलं गेलं.

पण त्याचवेळी ते स्वतःलाही दोष देतात. त्यांच्याकडून काही चूक झाल्यानेच, हे नातं तुटलं असा ते समज करुन घेतात. या दोन्ही भावनांशी संबंधित व्यक्ती झगडत असतो. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात माफीकडे विशेष लक्ष दिले गेले. मग ती माफी समोरच्या व्यक्तीला बिनशर्त माफ करणं असो किंवा स्वतःला माफ करून स्वतःचा विचार करणं असो.

---------
मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं?