Petrol-Diesel Price Today: मोदी सरकार करतंय तरी काय?, 12 दिवसात पेट्रोल-डिझेल 8.40 रुपयांनी महागलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IOCL, Petrol-Diesel Price Today 4 April 2022: देशातील मोदी सरकार नेमकं करतंय तरी काय? असा सवाल आता सामान्य जनता विचारु लागली आहे. कारण गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, दूध आणि भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या (Crude Oil Price) जवळपास पोहोचली असली तरी, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम आहे.

आज (सोमवार) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज म्हणजेच 4 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40-40 पैशांनी वाढ झाली आहे. यासह दिल्लीत आता पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

22 मार्चपासून पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची प्रक्रिया 22 मार्चपासून सुरू झाली. या दरम्यान 24 मार्च आणि 01 एप्रिल वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ झाली आहे. मागील 14 दिवसांत तब्बल 12 वेळा पेट्रोलच्या दरात अनुक्रमे 80, 80, 80, 80, 50, 30, 80, 80, 80, 80, 80 आणि 40 पैशांनी वाढ झाली आहे. अशाप्रकारे पेट्रोल तब्बल 8 रुपये 40 पैशांनी महागले आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर 118 रुपयांच्या पुढे

ADVERTISEMENT

इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 04 एप्रिल 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 118.83 रुपये झाला आहे. तर डिझेलचा दर 103.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. कृपया लक्षात घ्या की स्थानिक करानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राज्यानुसार बदलतात. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये 100 रुपयांच्या पुढे डिझेल विकले जात आहे.

ADVERTISEMENT

प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

> दिल्ली

पेट्रोल – 103.81 रुपये प्रति लिटर

डिझेल – 95.07 रुपये प्रति लिटर

> मुंबई

पेट्रोल – 118.83 रुपये प्रति लिटर

डिझेल – 103.07 रुपये प्रति लिटर

> चेन्नई

पेट्रोल – 109.34 रुपये प्रति लिटर

डिझेल – 99.42 रुपये प्रति लिटर

14 दिवसांत पेट्रोल 8.40 रुपयांनी महागलं

22 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत 14 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 12 वेळा वाढ करण्यात आली आहे. बहुतांश दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, तेलाच्या महागाईच्या परिणामामुळे जनतेला दिलासा मिळण्याची अजिबात अपेक्षा नाही.

कोणत्या दिवशी पेट्रोलचे दर किती वाढले?

  • 22 मार्च 80 पैसे

  • 23 मार्च 80 पैसे

  • 25 मार्च 80 पैसे

  • 26 मार्च 80 पैसे

  • 27 मार्च 50 पैसे

  • 28 मार्च 30 पैसे

  • 29 मार्च 80 पैसे

  • 30 मार्च 80 पैसे

  • 31 मार्च 80 पैसे

  • 02 एप्रिल 80 पैसे

  • 03 एप्रिल 80 पैसे

  • 04 एप्रिल 40 पैसे

पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या, चांदीची मस्ती उतरवली, सुबोध भावेने केंद्र सरकारवर साधला निशाणा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत SMS द्वारे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे (SMS) दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT