मुख्यमंत्र्यांशी व्यावहारिक संबंध असलेले हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत?-सोमय्या
किरीट सोमय्यांना बॉम्बे हायकोर्टाने विक्रांत घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना हा दिलासा मिळाल्यानंतरच त्यांनी हे जाहीर केलं होतं की आज आणखी एक घोटाळा बाहेर काढणार त्याप्रमाणे आता त्यांनी नवा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. तसंच हवाला किंग नंदकिशोर त्रिवेदी यांना कुठे लपवलंय? असाही प्रश्न किरीट […]
ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांना बॉम्बे हायकोर्टाने विक्रांत घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना हा दिलासा मिळाल्यानंतरच त्यांनी हे जाहीर केलं होतं की आज आणखी एक घोटाळा बाहेर काढणार त्याप्रमाणे आता त्यांनी नवा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. तसंच हवाला किंग नंदकिशोर त्रिवेदी यांना कुठे लपवलंय? असाही प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
Kirit Somaiya INS Vikrant: किरीट सोमय्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
काय म्हणाले किरीट सोमय्या?
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवलं आहे? त्याची माहिती जनतेला द्या अशी माझी विनंती आहे. नंदकिशोर त्रिवेदी हे उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर आहेत. त्यांच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी मनी लाँड्रींग केलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत? हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. आदित्य ठाकरे, तेसज ठाकरे, श्रीधर पाटणकर या सगळ्यांसोबत नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचं बाहेर आलं आहे असाही आरोप आज किरीट सोमय्यांनी केला.