वाझेंच्या सोसायटीचं CCTV फुटेज का आहे चर्चेत, नेमका घटनाक्रम काय?
मुंबई: अँटेलियाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचं कनेक्शन आता थेट सचिन वाझे यांच्याशी जोडलं जात आहे. एवढंच नव्हे सचिन वाझे ठाण्यात ज्या सोसायटीमध्ये राहतात त्याच सोसायटीतील CCTV फुटेज हे तर याचसंबंधी प्रचंड चर्चेत आलं आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याचा घटनाक्रम कसा होता यावर आपण टाकूयात एक नजर. मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ कार चोरीला […]
ADVERTISEMENT

मुंबई: अँटेलियाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचं कनेक्शन आता थेट सचिन वाझे यांच्याशी जोडलं जात आहे. एवढंच नव्हे सचिन वाझे ठाण्यात ज्या सोसायटीमध्ये राहतात त्याच सोसायटीतील CCTV फुटेज हे तर याचसंबंधी प्रचंड चर्चेत आलं आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याचा घटनाक्रम कसा होता यावर आपण टाकूयात एक नजर.
मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ कार चोरीला गेलेली नसून ती वाझेंनीच आपल्या सोसायटीत आणून ठेवली आणि त्याचं कुठेही फुटेज सापडू नये यासाठी सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं असावं असा एनआयएला संशय आहे. त्यामुळे सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजबाबतचा घटनाक्रम कसा आहे ते जाणून घेऊयात. (why is cctv footage of vazes society under discussion what exactly is the sequence of events)
17 फेब्रुवारी 2021: मनसुख हिरेन यांनी आपली स्कॉर्पिओ कार चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवली.
25 फेब्रुवारी 2021: हीच स्कॉर्पिओ कार मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानच्या बाहेर सापडली. ज्यामध्ये जिलेटीनटच्या कांड्या आणि धमकीचं पत्र सापडलं होतं.
वाझेंच्या सोसायटी CCTVबाबत मोठा खुलासा, ‘मुंबई तक’च्या हाती पत्र
27 फेब्रुवारी 2021: सचिन वाझे यांच्या CIU टीममधील एपीआय रियाझ काझी हे सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील सोसायटीत गेले. यावेळी त्यांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे तेथील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली.
मात्र, आपण पत्र दिल्याशिवाय हे सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाही असं पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर काझी यांनी त्यासंबंधी पत्र सोसायटीला दिलं. त्यानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज हे सीआययूच्या टीमकडे दिलं.
4 मार्च 2021: सचिन वाझे यांच्या सोसायटीने 4 मार्चला स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये याविषयी लिखीत स्वरुपात माहिती दिली. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, सीआययूच्या अधिकाऱ्यांनी आमच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज आधीच नेलं आहे. यासाठी त्यांनी आम्हाला पत्र देखील दिलं आहे. पण त्यांनी त्या पत्रावर त्यांनी आपला अधिकृत शिक्का मारलेला नाही.
14 मार्च 2021: दरम्यान, स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा तपास हा जेव्हा एटीएसकडे सोपवण्यात आला तेव्हा एटीएसच्या टीमने 14 मार्चला वाझेंच्या सोसायटीकडे 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यानचं सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली.
त्यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी एटीएसला कळवलं की, आपण मागत असलेले सीसीटीव्ही फुटेज हे याआधीच सीआययू टीमच्या एपीआय रियाझ काझी यांनी काही दिवसांपूर्वीच नेलं आहे.
दरम्यान, एनआयएच्या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, मनसुख हिरेन यांची कार चोरीला गेलीच नव्हती. तर ती सचिन वाझे राहत असलेल्या सोसायटीतील कम्पाउंडमध्येच पार्क करण्यात आली होती. मात्र, असं असलं तरीही अद्याप त्या सीसीटीव्ही फुटेजचं नेमकं काय झालं? याचं उत्तर काही मिळू शकलेलं नाही.