सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच असं का वाटतंय भाजपला?: मुख्यमंत्री

मुंबई तक

मुंबई: ‘जणू काही सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत. अशा पद्धतीने त्यांना जे काही वाटतंय ते कशासाठी?’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत भाजपवर टीका केली आहे. आज (10 मार्च) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांनी सचिन वाझे यांच्याबाबत बोलताना त्यांचा बचाव केला. सचिन वाझे काय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘जणू काही सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत. अशा पद्धतीने त्यांना जे काही वाटतंय ते कशासाठी?’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत भाजपवर टीका केली आहे. आज (10 मार्च) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांनी सचिन वाझे यांच्याबाबत बोलताना त्यांचा बचाव केला.

सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहेत का?: मुख्यमंत्री

‘हिरेन प्रकरण ज्याप्रकारे आहे तसंच मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावं आहेत. त्यातील काही जणांची नावं ही सभागृहात सांगितली आहेत. आता मुद्दा काय येतो तपास सुरु झाला आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत असं करता कामा नये की, आधी फाशी द्या आणि नंतर तपास करा. ही काही तपासाची पद्धत असू शकत नाही.’

‘तपासाला दिशा देण्याचं काम तुम्ही करु शकत नाही. तपास हा निपक्षपातीपणे झाला पाहिजे. त्यामुळे ही नवी पद्धत आलेली आहे की, एखाद्याला टार्गेट करायचं त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे आणि पूर्ण चारित्र्यहनन केल्यानंतर तपासात समोर आलं की, त्यामध्ये तो दोषीच नाही… तर मग? त्यामुळे आमचं काय म्हणणं आहे तपास सुरु आहे त्या तपासात जो कोणी असेल त्याच्यावर हे सरकार कारवाई करेल.’

हे वाचलं का?

    follow whatsapp