Independence Day: १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. यावर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होतं. त्यानंतर लाल किल्ला या राष्ट्रीय वास्तूवरून देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यात शेकडो स्वातंत्र्य वीरांनी बलिदान दिलं.

स्वातंत्र्य दिवसाचा इतिहास काय आहे?

भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांसह अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन सुरू केलं. पारतंत्र्याच्या बेड्या तोडून आपला देश उभा राहिला पाहिजे हे स्वप्न या सगळ्यांनीच पाहिलं होतं. त्यातूनच ही स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. त्यानंतर इंग्रजांनी ही चळवळ हे आंदोलन मोडण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले. मात्र अखेर त्यांना आपला देश सोडून जावंच लागलं.

स्वातंत्र्याची लढाई लढत असताना अनेक वीरांनी दिली प्राणांची आहुती

स्वातंत्र्याची लढाई लढत असताना अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली. आपल्या येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र हवेत श्वास घेणाऱ्या हव्यात यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडलं. त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

४ जुलै १९४७ ला काय घडलं?

४ जुलै १९४७ ला म्हणजेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक महिना आधी भारताच्या स्वातंत्र्याविषयीचं एक विशेष विधेयक सादर करण्यात आलं. हे विधेयक १५ दिवसांमध्ये संमत करण्यात आलं. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देशातून युनियन जॅक हटला म्हणजेच ब्रिटिशांचं साम्राज्य संपलं आणि स्वतंत्र भारताचा उदय झाला. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते.

भारताचा स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्टलाच का साजरा होतो?

४ जुलै १९४७ ला ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारताच्या स्वातंत्र्याबाबतचं विधेयक सादर केलं गेलं. त्यानंतर १५ दिवसात हे विधेयक संमत करण्यात आलं. या विधेयकात ही मंजुरी देण्यात आली होती की १५ ऑगस्ट १९४७ पासून ब्रिटिश शासन काळ समाप्त होईल. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT