मतदारांनी भाजपलाच मतदान का केलं; भाजपच्या मतदाराला कसं आकर्षित करता येईल? - Mumbai Tak - why voters voted for bjp how to attract bjp voters political strategist prashant kishor - MumbaiTAK
बातम्या

मतदारांनी भाजपलाच मतदान का केलं; भाजपच्या मतदाराला कसं आकर्षित करता येईल?

– प्रशांत किशोर, राजकीय रणनितीकार भाजपला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालं त्यामागचं कारण म्हणजे त्यांची निवडणुकीतील मेहनत. पण याशिवाय हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि निश्चित मतदारांवर लक्ष्य यांचा एकूण जो काही मिलाफ करण्यात आला तीच गोष्ट भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरली आहे. खरं म्हणजे या सगळ्याच शक्तिशाली असं हे संयोजनच भाजपला विजयापर्यंत घेऊन गेलं. तुम्हाला हिंदुत्वाच्या […]

– प्रशांत किशोर, राजकीय रणनितीकार

भाजपला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालं त्यामागचं कारण म्हणजे त्यांची निवडणुकीतील मेहनत. पण याशिवाय हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि निश्चित मतदारांवर लक्ष्य यांचा एकूण जो काही मिलाफ करण्यात आला तीच गोष्ट भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरली आहे. खरं म्हणजे या सगळ्याच शक्तिशाली असं हे संयोजनच भाजपला विजयापर्यंत घेऊन गेलं.

तुम्हाला हिंदुत्वाच्या बाजूने वैचारिकदृष्ट्या खंबीर व्हावं लागेल. फक्त सॉफ्ट हिंदुत्वावर अवलंबून राहता येणार नाही. तुम्हाला उदारमतवादी हिंदूंना अशा प्रकारे आवाहन करावे लागेल की जेणेकरुन ते उत्तेजित होतील. आणि आकडेवारी देखील हेच सांगते आहे. नेमकी आकडेवारी काय आहे यावर आपण एक नजर टाकूयात.

एकंदरीत भाजपला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 38 टक्के मते मिळाली आहेत. यातून जर आपण अल्पसंख्याकांना हटवले आणि आपण फक्त 80 टक्के मतदारांविषयी विचार केला तरी 80 टक्के हिंदूंपैकी भाजपला जवळजवळ 40 ते 50 टक्के हिंदूंची मते मिळत आहेत. त्यावरच त्यांचा विजय निश्चित होतो.

सरळ शब्दात सांगायचे झाले तर प्रत्येक हिंदूसाठी असे गृहीत धरूया की त्याचे मत हे भाजपला दिले जात आहे. कारण त्यांना भाजपच्या हिंदुत्वाबाबत खात्री आहे. पण असं असलं तरी प्रत्येक हिंदूला हे पटणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे मी आव्हानकर्ता असल्यास, या सगळ्या वादात पडण्यापेक्षा ज्यांना हे पटत नाही. त्या लोकांना मी आकर्षित करण्याचा प्रयत्न करेन. जे लोक भाजपच्या हिंदुत्वाबाबत आश्वस्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहचण्याआधी जे भाजपपासून काहीसे दूर आहेत त्यांच्याकडे लक्ष्य केंद्रीत करणं गरजेचं आहे.

माझा सुरुवातीचा मुद्दा असा आहे की ज्यांना अद्यापही भाजपबाबत खात्री पटलेली नाही म्हणजे गेल्या 10 वर्षांत तशी मतं जवळजवळ 40 टक्के आहे. ती मतं मिळवणं सहज शक्य आहे.

या देशातील विरोधकांना भाजपला 2024 मध्ये पराभूत करणं शक्य आहे. हो खरंच शक्य आहे. फक्त जर तुम्ही आजपासून त्यासाठी कामाला लागाल तर ते शक्य होऊ शकतं. जर तुम्ही जानेवारी 2024 मध्ये जागे व्हाल आणि त्यानंतर विरोधकांची मोळी बांधण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाशी युती करण्याचा प्रयत्न केला तर मात्र भाजपला पराभूत करणं शक्य नाही.

केंद्रात भाजपला आणि मोदींना आव्हान द्यायचं असेल तर विरोधी पक्षांनी निवडणुकीला एक-दोन महिन्यांचा कार्यक्रम समजू नये. तुम्ही जर असा विचार करुन चालणार असाल तर सर्वकाही समोर येऊन मिळेल अशी आशा धरु नका.

२०२४ निवडणुकीचे निकाल जवळपास निश्चीत; मोदींना आव्हान देताना विरोधक कुठे चुकतायत?

भाजपविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला नक्कीच चेहऱ्याची गरज लागणार आहे. पण त्यापेक्षाही जास्त गरज विरोधी पक्षाला रणनितीची लागणार आहे. भाजपचे नेते हे २४ तास कँपेन मोडमध्ये असतात. उत्तर प्रदेश जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी लगेच काही दिवसांत गुजरातमध्ये रोड शो करताना दिसले.

दुसरीकडे विरोधक तुम्हाला अजुनही शांत बसताना किंवा मंथन करताना दिसतात. त्यामुळे विरोधी पक्ष जर खरंच हुशार असतील तर त्यांनी आतापासून पुढील निवडणुकांची तयारी करायला हवी. तीन महिने आधी जाग येऊन काहीही साध्य होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 2 =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!