शिवसेनेनंतर आता युवा सेनेलाही ठाण्यात खिंडार; पूर्वेश सरनाईकांकडून आदित्य ठाकरेंना झटका

ठाणे जिल्ह्यातील शेकडो युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा
yuva sena members support to eknath shinde camp
yuva sena members support to eknath shinde camp

आमदारांचा एक मोठा गटा पक्षातून बाहेर पडल्यानं शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. आमदारांपाठोपाठ ठाण्यासह काही महापालिका आणि नगरपालिकांचे माजी नगरसेवकही शिंदे गटात सामील झाले असून, आता याचीच पुनरावृत्ती युवा सेनेत सुरू झाली आहे. युवा सेनेला ठाण्यात पहिलं खिंडार पडलं आहे. युवा सेनेचे सचिव आणि माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.

ठाणे जिल्ह्यातील युवा सेनेत कार्यरत असलेल्या तरुण आणि तरुणींनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. युवा सेना सचिव आणि माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्यासोबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला.

yuva sena members support to eknath shinde camp
शिंदे सरकारचं भविष्य काय?; सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर २० जुलैला सुनावणी

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेत वेगळी राजकीय वाट निवडली. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी राज्यात सत्ता स्थापन केली असून, आता एकनाथ शिंदे यांना विविध भागातील पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

आधी ठाणे त्यानंतर कल्याण डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर, नवी मुंबई येथील शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केलेला आहे. तर भिवंडी, मुरबाड, शहापूर, वसई विरार, पालघर या पट्ट्यातील अनेक माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेदेखील शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

शिवसेनेनंतर आता ठाणे जिल्ह्यातील युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिंदे गटाच्या बाजून जाण्यास सुरुवात झाली आहे.

yuva sena members support to eknath shinde camp
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रीय समाज पक्षात फूट; महादेव जानकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना शिंदे यांनी 50 आमदारांनी घेतलेल्या निर्णयामागील कारण सांगितली. 'आमदार, पदाधिकाऱ्यांची कामेच होणार नसतील, तर अशा सत्तेचा काही फायदा नव्हता. त्यामुळेच या सत्तेतून बाहेर पडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्ववादी पक्षासोबत युती केली.

'राज्यात आलेले युतीचे सरकार हे आपल्या सगळ्यांचे सरकार आहे. युवक-युवती यांचे शिक्षण, रोजगार आदी प्रश्न तातडीने सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे, आता सहज शक्य होणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

yuva sena members support to eknath shinde camp
एकनाथ शिंदेंचं बंड : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस-अमित शाहांना फोन, दहा दिवसांत काय घडलं?

यावेळी युवा सेनेचे सचिव आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, आमदार प्रताप सरनाईक, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि युवासेनेचे निखिल बुडजडे, विराज महामुणकर आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in