आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची पुन्हा कोंडी; नगरविकास खात्यावर ‘लक्ष’, मुख्यमंत्र्यांना केला सवाल
महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातला गेला. या मुद्द्यावर आदित्य ठाकरे शिंदे सरकारविरोधात थेट फ्रंटफुटवर आल्याचं दिसलं. त्यानंतर आता नगरविकास खात्यातंर्गत होत असलेल्या वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रोजेक्टसाठीच्या नोकर भरतीवरून आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा खिंडीत पकडलंय. शिवसेनेतल्या बंडानंतर आदित्य ठाकरे शिंदे गटाविरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टने आदित्य ठाकरेंना शिंदे सरकारला खिंडीत […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातला गेला. या मुद्द्यावर आदित्य ठाकरे शिंदे सरकारविरोधात थेट फ्रंटफुटवर आल्याचं दिसलं. त्यानंतर आता नगरविकास खात्यातंर्गत होत असलेल्या वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रोजेक्टसाठीच्या नोकर भरतीवरून आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा खिंडीत पकडलंय.
शिवसेनेतल्या बंडानंतर आदित्य ठाकरे शिंदे गटाविरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टने आदित्य ठाकरेंना शिंदे सरकारला खिंडीत गाठण्याची संधीच मिळाली. त्यानंतर आता वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रोजेक्टसाठी भरतीवरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय.
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना का लक्ष्य केलंय?
मुंबईत वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रोजेक्ट नगरविकास खात्यातंर्गत असलेल्या एमएसआरडीसी विभागाकडून सुरू आहे. या रोडवर चार टोल नाके प्रस्तावित असून, यासाठीची कंपनी बदलण्यात आलीये. हा मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.
Aditya Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रासाठी दिल्लीत गेलेत की स्वतःसाठी?