अब्दुल सत्तार, संजय राठोडांना सेफ करणाऱ्या ‘या’ शिंदे फॉर्म्युल्यानेच संजय शिरसाटांचा घात?
मंत्रिमंडळातून आऊट होणार… आऊट होणार या चर्चेनं फेर धरलेला असतानाच अब्दुल सत्तारांनी रात्रीतून चक्रं फिरवत बाजी मारली. तर दुसरीकडे संजय शिरसाट मंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ते मात्र क्लिनबोल्ड झाले. वादात सापडूनही सत्तार, संजय राठोडांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. हे घडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका फॉर्म्युल्यामुळे! मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला काय आणि याने […]
ADVERTISEMENT

मंत्रिमंडळातून आऊट होणार… आऊट होणार या चर्चेनं फेर धरलेला असतानाच अब्दुल सत्तारांनी रात्रीतून चक्रं फिरवत बाजी मारली. तर दुसरीकडे संजय शिरसाट मंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ते मात्र क्लिनबोल्ड झाले. वादात सापडूनही सत्तार, संजय राठोडांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. हे घडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका फॉर्म्युल्यामुळे! मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला काय आणि याने कोणाकोणाची विकेट काढली? अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंतांना मंत्री कसं केलं, याचा घेतलेला वेध…
एकनाथ शिंदेंनी २९ जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण मंत्रिमंडळचा विस्तार होण्यासाठी तब्बल ९ ऑगस्ट उजाडावा लागला. लवकर लवकर म्हणत चाळीस दिवस लागले. हे कशामुळे झालं, तर इच्छुकांच्या अपेक्षांमुळे!
शिंदेंनी ४० आमदार फोडले पण त्यांना समाधानी कसं करणार? त्यांची अपेक्षापूर्ती हा यक्षप्रश्न एकनाथ शिंदेंसमोर होता. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदेंनी दोन निकषांचा एक फॉर्म्युला काढला. या फॉर्म्युल्यातूनच ९ हा आकडा समोर आला. आणि अपक्ष छोट्या पक्षांना वगळून शिंदे गटाच्या ९ शिवसेना आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
‘मित्रपक्षानेच शिवसेनेवर आघात केला’; ‘धनुष्यबाणा’बद्दल शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला