Yakub Memon Grave: 30 वर्ष शिवसेनेच्या नाकाखाली हे सगळं सुरू होतं- आशिष शेलार

ऋत्विक भालेकर

मुंबई: मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरुन आता भाजपनं शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवरती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरुन आता भाजपनं शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवरती सडकून टीका केली आहे.

शिवसेनेविषयी काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलारांनी शिवसेनेवरती टीका करताना नवाब मलिकांनाही टार्गेट केले आहे. ”सत्तेत असताना शिवसेना दाऊदचं समर्थन करताना आम्ही पाहिलं पण आता याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण करण्यासाठी परवानगी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित होतो. कब्रिस्तानची सर्व देखरेख मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते. त्या महापालिकेत शिवसेनेची 30 वर्ष सत्ता आहे. त्यांच्या नाका खाली हे सगळं सुरू होतं. यांच्याच सरकारमध्ये अस्लम शेख, काँग्रेसचे मंत्री मुंबईचे पालकमंत्री झाले.

यांनीच याकुबला फाशी नको अशी मागणी केली होती.” असं आशिष शेलार म्हणाले आहेत. पुढे आशिष शेलार म्हणाले ”वानखेडे उखडण्यासाठी सेना गेली होती, पेंग्विन सेना आता या कब्रिला उखडवण्यासाठी जाणार का?. अस्लम ते नवाब आणि महापालिकेतील पेंग्विन सेना सोबत काम करत होते. तुकडे तुकडे गँगच्या दबावाखाली पेंग्विन सेनेने हे काम केलं असावं” असं आशिष शेलार म्हणाले आहेत

हे वाचलं का?

    follow whatsapp