‘अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ’; अंधेरीच्या निवडणुकीवरून शेलारांचा ठाकरेंवर पलटवार
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली. भाजपच्या माघारीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपनं घेतलेल्या या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’तून भाजपला कोपरखळ्या लगावत खडेबोल सुनावण्यात आलेत. दरम्यान, सामनातल्या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर दिलंय. अंधेरी […]
ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली. भाजपच्या माघारीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपनं घेतलेल्या या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’तून भाजपला कोपरखळ्या लगावत खडेबोल सुनावण्यात आलेत. दरम्यान, सामनातल्या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर दिलंय.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत भाजपनं ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला. भाजपनं घेतलेल्या भूमिकेबद्दल राजकीय अंगानं चर्चा होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं थेट इशारा दिलाय. सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण डागताना ठाकरेंनी शिंदे गटाला मिंधे गट म्हणत डिवचलं आहे.
सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर देत पलटवार केलाय. आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंना उत्तर दिलंय.
Andheri Bypoll : भाजपने माघार घेतल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…