election 2024: भाजपचा प्लान, केंद्राकडे प्रस्ताव! महाराष्ट्रात मध्यावधी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok sabha election 2024, maharashtra assembly election 2024: लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजतात. मात्र, 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची शक्यता बळावली आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्र भाजपने पक्षाच्या नेतृत्वाला दिलेला एक प्रस्ताव. या प्रस्तावाचा आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व गांभीर्याने विचार करत असून, प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यास महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबर होतीत. (Maharashtra bjp wants assembly elections 2024 with lok sabha polls)

‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने एक वृत्त दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल-मे 2024 मध्ये होणार आहेत. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2024 मध्ये अपेक्षित आहे. मात्र, राज्यात झालेलं सत्तांतर उदयास आलेली नवी राजकीय समीकरणं यामुळे राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

चुंबन प्रकरणावरून एसआयटी,अन् फोटोमुळे माझ्यावर गुन्हा: संजय राऊत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबरच? महाराष्ट्र भाजपचा केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव

लोकसभेच्या निवडणुका 2024 च्या म्हणजेच पुढच्या वर्षीच्या एप्रिल- मे महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर 5 ते 6 महिन्यात ऑक्टोबर 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात. मात्र, या प्रस्तावानुसार एप्रिल-मे महिन्यातच या दोन्ही निवडणुका घ्याव्यात, असा प्रस्ताव प्रदेश भाजपनं दिलाय. केंद्रीय नेतृत्वही या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत असल्याचा दुजोरा मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने दिला आहे.

महाराष्ट्र भाजपला मध्यावधी निवडणूक का हवीये?

मंत्र्यांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. या सरकारने अपेक्षित प्रभाव निर्माण केला आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेनेसोबतची युती लक्षात घेऊन भाजपनं हा प्रस्ताव तयार केला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत झाल्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केलं जाणार आवाहन आणि राष्ट्रीय मुद्दे मतदारांच्या मनावर प्रभाव टाकू शकतात. दोन्ही निवडणुकांसाठी मतपरिवर्तन होऊ शकतं, अशी भाजपची भूमिका आहे.

केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या माहितीनुसार भाजपचं केंद्रीय नेतृत्वही या पर्यायाचा विचार करत आहे. जर विधानसभा निवडणुका लोकसभेनंतर पाच-सहा महिन्यांनी झाल्या तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असंही या मंत्र्यांनी सांगितलं.

ठाकरे-दरेकरांमध्ये विधानसभेबाहेर सहानुभूतीची युती! नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी फुटणार? केंद्रीय मंत्र्याने काय म्हटलंय?

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीनंतर महाविकास आघाडीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा सूर उमटला आहे. असं असलं तरी भाजप मंत्र्यांने महाविकास आघाडीबद्दल मोठं विधान केलं आहे. केंद्रीय मंत्र्यांने असा दावा केला आहे की, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी निवडणुकीची घोषणा होईपर्यंत राहील. पण ही आघाडी शेवटपर्यंत राहील असं आम्हाला वाटत नाही. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडी फुटू शकते, असा दावा या मंत्र्यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT