पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केतकी चितळेवर अंडी आणि शाईफेक, पवार समर्थक प्रंचड संतापले
कळंबोली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात विकृत पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलंच महागात पडलं आहे. केतकीच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे समर्थक हे प्रचंड संतापले असून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केतकी चितळे हिच्यावर काळी शाई फेकून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी केतकीला धक्काबुक्की देखील झाली. केतकीने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या […]
ADVERTISEMENT

कळंबोली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात विकृत पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलंच महागात पडलं आहे. केतकीच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे समर्थक हे प्रचंड संतापले असून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केतकी चितळे हिच्यावर काळी शाई फेकून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी केतकीला धक्काबुक्की देखील झाली.
केतकीने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विकृत पोस्टनंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी तिच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारही नोंदवली आहे. त्यातच केतकीला पोलीस कळंबोलीहून कळवा पोलीस ठाण्यात नेत असताना तिच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अचानक शाई फेक आणि अंडी फेकली. यावेळी केतकीला मारहाण करण्याचा देखील प्रयत्न झाला.
कळंबोली पोलीस स्टेशनबाहेर केतकीसोबत काय घडलं?
या प्रकरणात सुरुवातीला केतकीला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी पोलिसांनी इथे तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर कळवा पोलीस हे कळंबोली पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर त्यांनी केतकीला आपल्या ताब्यात घेतलं आणि ते तिला कळव्याला घेऊन निघाले.