औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर करण्यास कॅबिनेटची मान्यता! ठाकरे सरकारचे तीन मोठे निर्णय

मुंबई तक

औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मान्यता दिली आहे. यासोबतच उस्मानाबादचं नामकरण धाराशिव हे करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मान्यता दिली आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देण्यात येण्याचा ठराव मंजूर केला गेला आहे. तीन महत्त्वाच्या निर्णयांना कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी दिली गेली आहे. ठाकरे सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत जे तीन निर्णय घेतले आहेत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मान्यता दिली आहे. यासोबतच उस्मानाबादचं नामकरण धाराशिव हे करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मान्यता दिली आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देण्यात येण्याचा ठराव मंजूर केला गेला आहे. तीन महत्त्वाच्या निर्णयांना कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी दिली गेली आहे.

ठाकरे सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत जे तीन निर्णय घेतले आहेत त्यातून त्यांनी एक प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेलाय. बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं की औरंगबादचं नामकरण संभाजी नगर करण्यात यावं. तो निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेशी संबंधित असलेल्या सामना या वृत्तपत्रात औरंगबादला कायमच संभाजी नगर असं म्हटलं जातं तर उस्मानाबादचा उल्लेख हा धाराशिव हा केला जातो. अशात ३९ आमदारांनी बंड पुकारलेलं असताना आपलं हिंदुत्व दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

कॅबिनेट मिटिंग सुरू होईपर्यंत ही चर्चा होती की उद्धव ठाकरे संभाजी नगर तसंच धाराशिव या नावांचा प्रस्ताव मांडतील त्याला काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे राजीनामा देतील. मात्र असं काहीही घडलं नाही. उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव मांडला त्यानंतर आता काँग्रेसनेही पुण्याचं नाव जिजाऊ नगर करावं ही मागणी केल्याचं समजतं आहे. तसंच नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव दिलं गेलं पाहिजे या मागणीलाही मान्यता देण्यात आली आहे.

आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत तीन मोठे निर्णय ठाकरे सरकारने घेतले आहेत. बंडखोर आमदार हे बहुतांश मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे मराठवाड्याशी संबंधित दोन निर्णय घेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आमदार आपल्याकडे वळतील का? हे बंड फुटेल का? यासाठीचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. आता उद्या विश्वासदर्शक चाचणीचं काय होणार याचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार आहे.

हे वाचलं का?