शिंदेंच्या शिवसेनेला 48 जागा? जागा वाटपाबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

chandrashekhar bawankule statement: आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याच्या विचारात आहे, त्यामुळे कामाला लागा. रात्र-रात्र काम करावे लागणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजप विधानसभेच्या 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्यानं केवळ 48 जागाच उरतात, त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला राहणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजपच्या सोशल मीडियाच प्रमुखांची आणि प्रवक्त्यांची कार्यशाळा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडली. या कार्यशाळेच्या समारोपावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दल भाष्य केलं.

शिंदे गटाकडे 50 च्यावर कुणी नाहीये, बावनकुळे विधानसभेच्या जागांबद्दल काय म्हणाले?

कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,”चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपले 150-170 निवडून येतील, पण आपण 240 जागा (विधानसभा निवडणूक) लढण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेंचे पन्नासच… कारण पन्नासच्या वर त्यांच्याकडे कुणी नाहीये. 240 जर लढल्या, तर अशा वेळी तुम्हाला टीम अलर्ट करावी लागेल.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुढे ते म्हणाले, “तुम्हाला खूप काम आहे. इतकं काम तुम्हाला राहणार आहे की, रात्र रात्र जागून काढावी लागणार आहे. मानसिक तयारी करा तुम्ही. डिसेंबर ते पुढचा काळ… तो काळ रात्रभर जागण्याचा काळ आहे. त्या काळात आपल्याला प्रशिक्षित टीम लागेल. तोपर्यंत तुम्हाला संबंध निर्माण करावे लागतील. मी वरच्या टीमला सांगणार आहे की, तुम्ही जिल्हा प्रवास करा. दोन दोन दिवसांचे जिल्हा प्रवास केले पाहिजे”, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

शिंदे गटाला 48 जागांवरच मानावं लागणार समाधान?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाने युतीतील जागा वाटपाच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. भाजपने आतापासूनच 2024 मधील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रमात बोलताना स्पष्टपणे म्हटलं आहे की, शिंदेंचे पन्नासच आहेत. पन्नासच्या वर त्यांच्याकडे कुणी नाहीये.

विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. त्यापैकी भाजप 240 जागा लढवण्याच्या विचारात आहे. त्यामुळे केवळ 48 जागाच शिल्लक राहतात. त्यामुळे बावनकुळेंच्या या फॉर्म्युल्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेला 48 जागाच वाट्याला येऊ शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT