नितीश कुमार-शरद पवारांच्या भेटीच्या वेळी महाराष्ट्रातले जदयू आमदारही उपस्थित
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातले जदयूचे आमदार कपिल पाटील आणि सच्चिदानंद शेट्टीही उपस्थित होते. नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते आहे. २०२४ मध्ये मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचं काम होतं आहे. एनडीएला महाआघाडी […]
ADVERTISEMENT

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातले जदयूचे आमदार कपिल पाटील आणि सच्चिदानंद शेट्टीही उपस्थित होते. नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते आहे. २०२४ मध्ये मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचं काम होतं आहे. एनडीएला महाआघाडी तोंड देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जदयूचे दोन महाराष्ट्रातले आमदार भेटीदरम्यान उपस्थित
बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्ली येथे सहा जनपथ निवासस्थानी आज भेट झाली. त्यावेळी सोबत महाराष्ट्रातील जदयू आमदार कपिल पाटील आणि सच्चिदानंद शेट्टी हे देखील उपस्थित होते. नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतला असून त्यात ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
काय म्हटलं आहे नितीश कुमार यांनी?
आमची चर्चा सुरू आहे. पुढेही या चर्चा होतील. जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊ. सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षही एकत्र आले पाहिजेत तसं घडलं तर त्यात राष्ट्राचं हित आहे असंही नितीश कुमार म्हणाले आहे. सगळे पक्ष एकत्र आले तर २०२४ ला राष्ट्रहित घडेल असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का नितीश कुमार?
मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी नितीश कुमार हे विविध नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेत आहेत. अशात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तुम्ही २०२४ मध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील का? असा प्रश्न विचारल्यावर नितीश कुमार म्हणाले की मी चेहरा नसेन पण सगळ्यांची मोट एकत्र बांधायची यासाठी पूर्ण प्रय़त्न करणार आहे असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं.