Advertisement

Narayan Rane :"एकनाथ शिंदेच बाळासाहेबांचे शिवसैनिक, त्यांच्यामुळे शिवसेना उभी"

जाणून घ्या नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Eknath Shinde True Shivsaink Of Balasaheb Thackaeray Says Narayan Rane
Eknath Shinde True Shivsaink Of Balasaheb Thackaeray Says Narayan Rane

एकनाथ शिंदे हेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांच्यामुळेच आज शिवसेना उभी आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यावरही नारायण राणे यांनी टीका केली आहे. एवढंच नाही तर शिवाजीपार्कवर दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांचाच होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

लघुउद्योग भारती संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना देण्याच्या अनुषंगाने हे अधिवेशन महत्त्वाचं मानलं जातं आहे. या अधिवेशनात उद्योजक आपल्याला येणाऱ्या समस्या आणि आव्हानं यांचीही चर्चा करतात. कोरोनामुळे दोन वर्षे हे अधिवेशन होऊ शकलंल नव्हतं.

नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवरही आरोप

मागच्या निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र लढले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. गद्दारी करणं हे त्यांच्या रक्तात आहे त्यामुळेच ते सारखं गद्दार गद्दार म्हणत आहेत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी साहेबांना साथ दिली म्हणून आज शिवसेना उभी राहिली. ते लोणी आज आदित्य ठाकरे खात आहेत असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनी गप्प बसावं

आदित्य ठाकरेंनी जरा गप्प बसावं आम्हाला बोलायला लावू नका, आम्ही जर बोललो तर मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी बाहेर काढू. आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना काय दिलंय? असाही प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तर काय फरक पडतो? आदित्य ठाकरे विरोधी पक्षात आहेत त्यामुळे रस्त्यावर यायला हवं. आदित्य ठाकरेंबाबत मला प्रश्न विचारू नका तो वेड्यासारखं बडबडतोय असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

आम्ही आमची मुंबई म्हणतो. पण आर्थिक उलाढालीत आपण मराठी एक टक्का नाही. आपल्या देशात मारवाडी 1 टक्का आहे आणि उलाढाल किती 23 टक्के आहे. आपण म्हणतो मुंबई आमची पण आर्थिक उलाढालीत आपण फक्त एक टक्का आहे. जो राजकारणी स्वतः काही करत नाही तो दुसऱ्याच्या खिशात हात घालतो, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. मी आधी उद्योजक मग राजकारणी आहे, असेही यावेळी राणेंनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in