Gujarat Assembly Election 2022 Dates : गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान, 8 डिसेंबरला निकाल

Gujarat Assembly Election 2022 schedule : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
Gujarat Assembly election dates announced by election commission
Gujarat Assembly election dates announced by election commission

Gujarat Assembly Election 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलेलं असून, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त अनुप चंद्र पांडे यानी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीये. २०१७ प्रमाणेच २०२२ मध्ये होत असलेल्या विधानसभेची निवडणुकही दोन टप्प्यात होणार आहे.

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम एकाच वेळी जाहीर केला गेला नसला, तरी दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे ८ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक मतदान, निकाल... असा आहे संपूर्ण कार्यक्रम (Gujarat assembly election 2022 detail shedule)

- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होणार, तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरला अधिसूचना निघणार.

- पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर (सोमवार) आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस १७ नोव्हेंबर आहे.

-पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाची पडताळणीची तारीख १५ नोव्हेंबर आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील अर्ज छाननी तारीख १८ नोव्हेंबर आहे.

-पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान होत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस १७ नोव्हेंबर आहे. तर दुसऱ्या टप्प्यात तारीख २१ नोव्हेंबर आहे.

-पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी १ डिसेंबर २०२२, गुरुवारी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी ५ डिसेंबर, सोमवारी मतदान पार पडणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, १० डिसेंबर निवडणूक घेण्याची अखेरची तारीख आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in