‘हर हर महादेव’वरून ठाण्यात राडा! प्रेक्षकाला मारहाण, जितेंद्र आव्हाडांसह 100 जणांविरुद्ध गुन्हा
छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपट वादात सापडले आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी तिकिटाचे पैसे परत मागणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १०० कार्यकर्त्यांवर […]
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपट वादात सापडले आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी तिकिटाचे पैसे परत मागणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळातील मावळ्यांच्या आयुष्यावर काढल्या जाणाऱ्या चित्रपटातून इतिहासाशी तथ्यांची तोडमोड केली जात असल्याचा आरोप होतोय. छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशा चित्रपटांविरुद्ध आक्रमक झाले आहे. सोमवारी रात्री (७ नोव्हेंबर) जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला.
यावेळी प्रेक्षकांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. या प्रकारावरून आता जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे.
“राष्ट्रवादीच्या डोक्यातून ‘जात’ अजिबात जात नाही”, शरद पवारांचा उल्लेख, मनसे नेत्यांचं टीकास्त्र