Mumbai Tak /बातम्या / Womens Day Special: महाराष्ट्रात आजवर किती महिला झाल्या आहेत मंत्री?
बातम्या राजकीय आखाडा

Womens Day Special: महाराष्ट्रात आजवर किती महिला झाल्या आहेत मंत्री?

Which chief minister has given the most opportunities to women in his cabinet मुंबई: महिला दिनाच्या (womens day) दिवशी महिला आमदारांना विधानसभेत (Vidhansabha) त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी दिली आणि चर्चा सुरू झाली ती शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Govt) एकही महिला मंत्री का नाही? पण, 1960 पासून 20 मुख्यमंत्री (Chief Minister) महाराष्ट्राला मिळाले. यापैकी आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळात (Cabinate) किती महिलांना (Women) स्थान दिलं? कोणत्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांची संख्या किती होती? कोणत्या पक्षानं महिलांना अधिक संधी दिली? हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (how many women have become ministers in maharashtra so far in state cabinate)

शिंदे-फडणवीस सरकारनं महिला आमदारांना विधानसभेत प्रश्न मांडण्याची संधी दिली. पण, मंत्रिमंडळात एकही मंत्री नाहीत यावरून त्यांच्यावर टीका झाली. पण, 1960 पासून महाराष्ट्राच्या कॅबिनेटची माहिती काढली. त्यानुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महिला नव्हत्या असं नाही. अगदी 1960 चं यशवंतराव चव्हाणांचं जे पहिलं मंत्रिमंडळ होतं, त्यात देखील महिला आमदाराला थेट कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं होतं. पण, त्यांची संख्या किती? तर फक्त एक. निर्मला राजे भोसले या अशा एकमेव मंत्री होत्या ज्यांना कॅबिनेटमध्ये सोशल वेलफेअर, महिला-बालकल्याण खातं मिळालं होतं.

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल… महिला मुख्यमंत्री का मिळाल्या नाही? याची चर्चा नेहमीच रंगते. पण, आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळात किती महिलांना स्थान दिलं? तर याचं उत्तर 3 असं आहे. होय आतापर्यंत महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचा आकडा फक्त 3 आहे. यापेक्षा अधिक कुठल्याही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. तर असे कोणते मुख्यमंत्री आहेत ज्यांनी 3 महिलांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं, यात उद्धव ठाकरे, विलासराव देशमुख आणि बाबासाहेब भोसले, असे काही काही बोटावर मोजण्याइतक्या मुख्यमंत्र्यांची नावं सापडतात.

Women’s Day Special: भाजपच्या मंत्र्यांनी सांगितला पुरुषांना सुखी संसाराचा मंत्र, म्हणाले…

बाबासाहेब भोसलेंच्या सरकारमध्ये शरदचंद्रीका सुरेश पाटील, प्रतिभाताई पाटील, शालिनीताई पाटील या तिन्ही कॅबिनेट मंत्री होत्या, विलासराव देशमुखांच्या पहिल्या मंत्रिमंडळात विमल मुंदडा, मिनाक्षी पाटील, सुलेखा कुंभारे या तिन्ही राज्यमंत्री होत्या, तर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या कॅबिनेट, तर अदिती तटकरे या राज्यमंत्री होत्या.

आतापर्यंत जास्तीत जास्त 3 महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं असलं तरी यात काँग्रेस नेहमी आघाडीवर दिसते. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून इकडे विलासराव देशमुख आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या महिला मंत्र्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या प्रत्येक मंत्रिमंडळात काँग्रेसच्या एक-दोन महिला दिसतात. महाविकास आघाडीचा विचार केला तर 3 महिला मंत्री होत्या. त्यातही यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या दोन्ही कॅबिनेट मंत्री काँग्रेसच्या होत्या. तर भाजपनं सेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये आतापर्यंत फक्त शोभाताई फडणवीस यांना दोनदा, विद्या ठाकूर आणि पंकजा मुंडे यांना एकदा संधी दिली. तर शिवसेनेनं मनिषा निमकर यांना राज्यमंत्रिपद दिलं होतं. मनिषा निमकर या शिवसेनेच्या आतापर्यंतच्या पहिल्या राज्यमंत्री आहेत.

Women’s Day Special: अमृता फडणवीस म्हणतात, ट्रोलर्सना मी का घाबरू?

राष्ट्रवादीचा विचार केला, तर फौजिया खान, अदिती तटकरे, विमल मुंदडा यांसारख्या महिलांना मंत्रिमंडळात संधी मिळाली.

आतापर्यंत 9 मुख्यमंत्र्यांनी फक्त एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान दिलं. यात यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या मुख्यमंत्र्यांची नावं येतात. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या काळात महाराष्ट्रात महिला धोरण राबवण्यात आलं. शरद पवार आतापर्यंत चारवेळा मुख्यमंत्रिपदी राहिले. पण, त्यांच्या १९८८ च्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नव्हतं.

आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. पण, एकनाथ शिंदेंचं असं एकच मंत्रिमंडळ आहे का? तर नाही…याआधी शरद पवार १९८८ ला मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नव्हतं. वसंतदादा पाटील १९७८ ला काही दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यांचं १३ जणांचं मंत्रिमंडळ होतं. या मंत्रिमंडळात एकही महिला नव्हती. तसेच शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते त्यावेळी एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं दिसत नाही.

International Women’s Day: महिला दिनी जेष्ठ महिलांचं खास सेलिब्रेशन, पाहा फोटो

Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार? bageshwar dham sarkar: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध दुसरा गुन्हा Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा बिकनीत बोल्ड अंदाज ग्लॅमरस जग सोडून ‘या’ 10 अभिनेत्रींनी मृत्यूला कवटाळलं, गळफास घेऊन संपवलं आयुष्य!