Balasaheb Thackeray: CM शिंदे म्हणाले, ‘मी आज फक्त बाळासाहेबांमुळेच..’
Cm Eknath Shinde Press Conference Mumbai Balasaheb Thackeray: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज (23 जानेवारी) जयंती साजरी केली जात आहे. मात्र, यावेळी देखील शिंदे आणि ठाकरे असे दोन्ही गट बाळासाहेबांची जयंती साजरी करताना एकमेकांवर कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेने (Shiv Sena) (UBT) आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून (Saamana) मुख्यमंत्री एकनाथ […]
ADVERTISEMENT

Cm Eknath Shinde Press Conference Mumbai Balasaheb Thackeray: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज (23 जानेवारी) जयंती साजरी केली जात आहे. मात्र, यावेळी देखील शिंदे आणि ठाकरे असे दोन्ही गट बाळासाहेबांची जयंती साजरी करताना एकमेकांवर कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेने (Shiv Sena) (UBT) आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून (Saamana) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केली आहे. पण जेव्हा याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी यावर काहीही न बोलणं पसंत केलं. मात्र, बाळासाहेबांबद्दल मुख्यमंत्री भरभरून बोलले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (i am chief minister of state today only because of balasaheb thackerays blessings see what cm shinde said)
‘माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन.. त्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. माझ्या आयुष्यात सगळं योगदान बाळासाहेबांचंच आहे. एकही क्षण असा जात नाही की, त्यांची आठवण येत नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलं.
पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांबद्दल काय म्हणाले:
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा जन्मदिवस म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना एक आनंदाचा दिवस असतो. त्यांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करत होतो. आज देखील अनेक ठिकाणी त्यांच्या या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत. अनेक आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील… अनेक समाजाभिमुख उपक्रम आज सुरू होत आहे. आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात देखील बाळासाहेबांचं तैलचित्र देखील आम्ही लावणार आहोत. अध्यक्ष महोदयांना आम्ही धन्यवाद देतो की, त्यांनी एक चांगला निर्णय घेतला. ज्यांचं योगदान फक्त राज्यात नाही तर देशभरात होतं. जगभरात बाळासाहेबांची किर्ती पसरली. अशा या व्यक्तिमत्वाच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे.’
‘शिवसेनाप्रमुखांमुळेच.. बाळासाहेबांमुळे सर्वसामान्य कार्यकर्ते आज मोठमोठ्या पदांची जबाबदारी स्वीकारत आहेत. माझ्या सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होऊन.. त्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मी आदरणीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो.’
‘माझ्या आयुष्यात सगळं योगदान बाळासाहेबांचंच आहे. एकही क्षण असा जात नाही की, त्यांची आठवण येत नाही. कारण त्यांनी जो काही आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवला आहे. जी काही शिकवण आहे त्यांची सर्वसामान्य माणसाला न्याय देणं. बाळासाहेबांचा एक मूलमंत्र होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आमचे सरकार हाच मूलमंत्र घेऊन काम करत आहे.’