“मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय”, विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-एजाज खान

jitendra awhad molestation case : जामीनावर बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याचं समजल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबर खोडसाळपणा केला जात असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाला विरोध केलाय. ठाण्यात चित्रपटाचा शो ही आव्हाडांनी बंद पाडला होता. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीनावर बाहेर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

जितेंद्र आव्हाड म्हणतात माझ्या अटकेसाठी चाणक्यांचे पोलिसांना सतत फोन, नेमका कुणाकडे रोख?

ADVERTISEMENT

जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

रविवारी (13 नोव्हेबर) रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं उद्धघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी विनयभंग केल्याचा दावा तक्रारदार महिलेकडून करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार देणारी महिला भाजप महिला मोर्चाची उपाध्यक्ष आहे.

ADVERTISEMENT

महिलेच्या आरोपानुसार या कार्यक्रमात आपण एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पुढे आलो होतो. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मला पकडून बाजूला केलं. माझ्या परवानगीशिवाय हात लावून निंदाजनक कृत्य आव्हाडांनी केल्याचं महिलेनं म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड यांना अटक; ठाण्याच्या चित्रपट गृहातील राड्याप्रकरणी कारवाई

जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार, ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासांत २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४. मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत”, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना अटक झाली होती. जामीन मिळाल्यानंतर न्यायालयीन कोठडीतून बाहेर आलेल्या जितेंद्र आव्हाडांविरुद्ध आता आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT