Satyajeet Tambe यांना BJP पाठिंबा देणार?, महाजनांनी काँग्रेसला डिवचलं

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

BJP vs Congress Vidhan Parishad Election: नाशिक: नाशिक विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आता प्रचंड रंगत आली आहे. कारण या मतदारसंघात शिवसेनेने (Shiv Sena) पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने आता नाशिकमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) वि. शुभांगी पाटील यांच्यात थेट निवडणूक होणार आहे. या सगळ्यात भाजप (BJP) नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काँग्रेसला (Congress) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने अतिशय चोख रणनिती राखून आखून काँग्रेसच्या उमेवाराला निवडणुकीपासून दूर राखलं आणि आपल्याला हवा असलेल्या उमेदवाराला अपक्ष निवडणूक अर्ज भरू दिला. मात्र असं असताना अचानक शिवसेनेने अपक्ष शुभांगी पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी व्हावी यासाठी भाजपने आज अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या क्षणापर्यंत बरेच प्रयत्न केले. पण शुभांगी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही.

नाशिक विधान परिषद: सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष फॉर्म

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत शुभांगी पाटील या नॉट-रिचेबल होत्या. या सगळ्याबाबत माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी काँग्रेसला डिवचलं आहे.

पाहा गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले:

‘कोणाला निलंबित करावं, कोणाला पक्षात घ्यावं हा काँग्रेसचा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपने यावर प्रतिक्रिया द्यावी असं काही नाही. पण जे नाना पटोले म्हणाले की, भाजप हे घर फोडण्याचं काम करत आहेत. मला असं वाटतं की, तुम्ही तुमचं घर सांभाळू शकत नाही आणि आम्हाला कशाला दोष देताय. मला वाटतं जे-जे मुख्य लोकं आहेत ते सगळे पक्ष सोडून चालले आहेत. अजून काही मोठे लोकं हे वाटेवर आहेत.’

ADVERTISEMENT

‘मला असं वाटतं तीन वाजेपर्यंत कोण माघार घेणार, कोण फॉर्म कायम ठेवणार यावर सगळं ठरणार आहे. मला वाटतं की, 3 वाजेनंतर आमचे जे अध्यक्ष आहेत बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीसजी ते याबाबतीत भूमिका स्पष्ट करतील की, आमचा पाठिंबा कुणाला आहे. पण अद्याप आमचं काही ठरलेलं नाही.’

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणूक 2023: पाच मतदारसंघात कोण कोणाला भिडणार?

‘मला वाटत नाही की, फडणवीसांची खेळी आहे की काय.. ते पक्ष श्रेष्ठी आहेत तेच याबाबतीत निर्णय करतील काय असेल नसेल तो. पण हे निश्चित आहे की, आम्ही कोणालाही एबी फॉर्म दिलेला नाही किंवा आमचा अधिकृत उमेदवार तिथे नाही. मला वाटतं नाशिक मतदारसंघात आता कुठल्याही पक्षाचा उमेदवार नाही. काँग्रेसचाही राहिलेला नाही. त्यांचा सुद्धा एबी फॉर्म दिलेला असताना उमेदवाराने फॉर्म भरला नाही. त्यामुळे आता सर्व अपक्षांमध्ये गणितं आहेत. त्यामुळे सगळं चित्र तीन वाजेनंतरच स्पष्ट होईल.’

‘एक गोष्ट निश्चित आहे की, आम्ही ज्याला पाठिंबा देऊ तो उमेदवार खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येईल.’

‘मला वाटतं की, आमच्या खेळीपेक्षा तुम्ही तुमचं घर सांभाळलं पाहिजे. तुमच्या घरात आलबेल नाही. तुमच्या महाविकास आघाडीत एकमत नाही आणि तुम्ही आम्हाला कशाला दोष देता.’ असं म्हणत गिरीश महाजन यांनी काँग्रेसला डिवचलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT