भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचा प्लान ठरला; शिर्डीत नेते-पदाधिकाऱ्यांनी घेतली शपथ
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली. त्याच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं समोर आलं. पक्षातंर्गत धुसफुस सुरू असतानाच काँग्रेसचं शिर्डीत नवसंकल्प शिबीर होत असून, या शिबिरात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी नाना पटोले म्हणाले, “उदयपूर नवसंकल्प शिबिरात सोनिया गांधी, राहुल […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली. त्याच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं समोर आलं. पक्षातंर्गत धुसफुस सुरू असतानाच काँग्रेसचं शिर्डीत नवसंकल्प शिबीर होत असून, या शिबिरात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी नाना पटोले म्हणाले, “उदयपूर नवसंकल्प शिबिरात सोनिया गांधी, राहुल गांधींनी केलेलं मार्गदर्शन आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून शिर्डीत दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.”
“जेव्हा केव्हा हिमालय संकटात आला, तेव्हा सह्याद्री धाऊन गेलाय. त्यामुळे सह्याद्रीच्या भागातच काँग्रेसचं शिबीर होत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून संविधानिक व्यवस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलंय. देशाची संपत्ती दररोज विकली जातेय. देश संपवायला ते निघाले आहेत. त्यामुळे हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री खंबीर असल्याचा संदेश देण्यासाठी हे शिबीर होत आहे,” असं पटोले म्हणाले.
उदयपूरमध्ये झालेल्या नवसंकल्प अधिवेशनाच्या अंमलबजावणीचं हे अधिवेशन आहे. या शिबिरात जे नेते, पदाधिकारी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहिले आहेत. त्यांना राजीनामे देण्याचं आवाहन आम्ही केलंय. जवळपास सगळ्यांनीच राजीनामे दिले आहेत. एकापेक्षा जास्त पदावर असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे राजीनामे दिले आहेत. ४०-५० लोकांनी राजीनामे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,” अशी माहिती पटोले यांनी दिली.