Hasan Mushrif : कार्यकर्ता ते कोल्हापुरमधील राष्ट्रवादीचा चेहरा… हसन मुश्रीफ कोण आहेत?
कोल्हापूर : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरुद्ध ईडीने (ED) कारवाई सुरू केली आहे. आज सकाळी 25 जणांच्या ईडीच्या पथकाने (ED team) हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापा टाकला आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर […]
ADVERTISEMENT

कोल्हापूर : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरुद्ध ईडीने (ED) कारवाई सुरू केली आहे. आज सकाळी 25 जणांच्या ईडीच्या पथकाने (ED team) हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापा टाकला आहे.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर तब्बल 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. यात त्यांच्यावर प्रामुख्याने अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यासंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप आहेत. दरम्यान, या छापेमारीनंतर मुश्रीफ नेमके कोण आहेत, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
आपण जाणून घेऊ हसन मुश्रीफ यांच्याबाबत :
कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचा चेहरा…
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ हे एक मोठं नाव आहे. जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून १९९९ पासून ते सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आघाडी सरकार सत्तेत असताना ते सातत्याने मंत्रीही राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लिम चेहरा अशी त्यांची ओळख आहे. आक्रमक स्वभाव, बेधडक आणि बिनधास्त वृत्तीचे नेते म्हणूनही त्यांची ख्याती आहे.