‘देशाच्या अर्थमंत्री बारामतीत आल्यास मी त्यांचं स्वागत करेन;’ सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला. सध्या बारामतीत भाजपचं लक्ष आहे, यावर बोलताना सुळे म्हणाल्या, राजकीयदृष्टीने बारामतीत विरोधकांनी जरूर यावे. मी त्यांचं स्वागत करेन. मात्र लोकसभा मतदानावेळी बारामतीची जनता मतपेटीतून आमची ताकद दाखवून देईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार, अजित पवार आणि मी सामाजिक बांधीलकीनं […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला. सध्या बारामतीत भाजपचं लक्ष आहे, यावर बोलताना सुळे म्हणाल्या, राजकीयदृष्टीने बारामतीत विरोधकांनी जरूर यावे. मी त्यांचं स्वागत करेन. मात्र लोकसभा मतदानावेळी बारामतीची जनता मतपेटीतून आमची ताकद दाखवून देईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार, अजित पवार आणि मी सामाजिक बांधीलकीनं बारामतीत विकास कामं केली आहेत, त्यामुळे विरोधक देखील बारामतीसारखा विकास करायला पाहिजे असं सांगतात.
बारामतीत येण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्यांना लोकशाहीने दिला आहे. जर भारताच्या अर्थमंत्री बारामतीत येत असतील तर चांगलंच आहे, जर मी तिथे असेल तर त्यांचं स्वागत करेन. पण माझं संविधान आणि जनतेवर विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या. त्याच बरोबर बारामतीवर इतके लोक लक्ष घालत असतील तर बारामतीमध्ये काहीतरी विशेष असणार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यसरकारवर साधला निशाणा
राज्यात चांगले कामं होत होते. मात्र सरकार पाडण्यात घाई केली. ते करताना दुसऱ्या राज्याची मदत घेतली, हे दुर्दैवी आहे. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला मात्र अद्याप पुणे जिल्ह्यासह राज्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्री अभावी राज्याचा विकास ठप्प झाला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असताना सर्व दृष्टिकोनातून कामकाजाचे निर्णय तत्परतेने घेतले जात होते. मात्र आता पालकमंत्र्यांअभावी विकास कामाचे निर्णय प्रलंबित झालेले आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.