“रोहित पवारांचं भविष्य भाजपच्या लोकांनी सांगितलं”, शरद पवारांना नेमकं काय म्हणायचं आहे?
रोहित पवार हे सध्या ईडीच्या रडारवर आले आहेत. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. याबाबत शरद पवारांना आज ठाण्यात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हटलं आहे शरद पवारांनी? रोहित पवारांच्या संदर्भात काय होणार आहे याचं भविष्य भाजपच्या लोकांनी आधीच सांगितलं. आजकाल महाराष्ट्रात […]
ADVERTISEMENT

रोहित पवार हे सध्या ईडीच्या रडारवर आले आहेत. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. याबाबत शरद पवारांना आज ठाण्यात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे शरद पवारांनी?
रोहित पवारांच्या संदर्भात काय होणार आहे याचं भविष्य भाजपच्या लोकांनी आधीच सांगितलं. आजकाल महाराष्ट्रात असे लोक आहेत जे सांगत असतात की असं घडणार आहे. यांच्या घरावर धाड पडणार आहे. यांच्याकडे असं असं घडणार आहे असे नेते आहेत. अधिकृत माहिती मिळाल्याचं भासवून लोक असं करत असतात. असा एक वर्ग महाराष्ट्रात तयार झाला आहे लोक त्यासंबंधी योग्य विचार करतील. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांचं नाव न घेताही टोला लगावला आहे. आपल्याला कुठूनतरी माहिती मिळाली आहे असा भास निर्माण करून त्यावर भाष्य करणारा वर्ग महाराष्ट्रात तयार झाला आहे. त्यांच्याबाबत लोक योग्यवेळी निर्णय घेतली असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 दरम्यान संचालक होते. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही 2006 ते 2009 दरम्यान कंपनीचे संचालक होते. त्यावेळी कंपनीत येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याही सहभाग होता. मात्र, येस बँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.