छत्रपतींवरील वादग्रस्त वक्तव्यांनंतर अमोल कोल्हे संतापले : नेमकं खुपतयं काय? भाजपला सवाल

मुंबई तक

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. अशातच काही दिवसांपासून सार्वजनिक व्यासपीठापासून दुर असलेले आणि भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा असलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे.

अशातच काही दिवसांपासून सार्वजनिक व्यासपीठापासून दुर असलेले आणि भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा असलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांसमोर येत या वक्तव्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला नेमकं खुपतयं काय? असा सवाल विचारत त्यांनी भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी काय भूमिका आहे हे मराष्ट्रासमोर स्पष्ट स्पष्ट करावं, अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता माननीय सुधांशुजी त्रिवेदी यांनी अत्यंत संतापजनक आणि उद्वेगजनक विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं काय खुपतयं काय तुम्हाला? म्हणजे कधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, कधी महामहिम राज्यपाल बोलतात. वारंवार ही बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज का केली जातात? काय खुपतयं काय तुम्हाला?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घालून लोककल्याणाचं काम करावं हा आदर्श घालून दिला. हा तुम्हाला खुपतोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी हे वास्तव अधोरेखित केलं हे तुम्हाला खुपतयं? छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी कसं प्रेरीत केलं जाऊ शकतं हे उदाहरणं या मातीत घालून दिलं, हे तुम्हाला खुपतयं?

हे वाचलं का?

    follow whatsapp