NCP : ”राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वात …”, प्रफुल्ल पटेल यांचे मोठं विधान

प्रशांत गोमाणे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांच्या नेतृत्वात एकसंघ असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तसेच पक्ष आणि चिन्ह देखील आम्हालाच मिळेल असा दावा देखीव पटेल यांनी पुन्हा एकदा केला आहे.

ADVERTISEMENT

praful patel big statement ncp ajit pawar sharad pawar election commison decision verdha sabha
praful patel big statement ncp ajit pawar sharad pawar election commison decision verdha sabha
social share
google news

वर्धा, सुरेंद्र रामटेक  

अजित पवार बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी फुट पडली होती.या फुटीनंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्व घडामोडींवर आता अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठं विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांच्या (Ajit pawar) नेतृत्वात एकसंघ असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तसेच पक्ष आणि चिन्ह देखील आम्हालाच मिळेल असा दावा देखीव पटेल यांनी पुन्हा एकदा केला आहे. (praful patel big statement ncp ajit pawar shara pawar verdha sabha)

वर्ध्यातील धुनीवाले मठ येथे अजित पवार गटाची परिवर्तन सभा पार पडली. या सभेत प्रफुल्ल पटेल बोलत होते. राष्ट्रवादी पक्षात दोन गट दिसत असले तरी, येणाऱ्या काळात निवडणूक आयोगाकडून जो निकाल लागेल तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते अजितदादांच्या मागे एकसंधपणे उभे असतील, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

हे ही वाचा :Maratha Morcha : ‘मराठा आरक्षणाला शरद पवारांचा पाठिंबा नाही’; भाजपने दिला पुरावा

अजित पवार यांच्या नेतृत्वात असलेला राष्ट्रवादी पक्षच महत्वाचा आहे आणि यापुढेही राहणार आहे. तसेच पक्ष, पक्षाचं चिन्ह आणि नाव आम्हालाच मिळणार अशी अपेक्षा आहे, कारण 90 टक्के नेते, कार्यकर्ते , लोकप्रकतिनिधी अजित पवारांसोबत आहेत, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

शरद पवार आयुष्यभर आमचेच नेते

शरद पवार साहेब कालपर्यंत माझे नेते होते. आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत आणि आयुष्यभर राहतील. नेत्यांच्या आदराबाबतीत कुठेही एक टक्काही फरक पडला नाही. तसेच कुठेही त्यातून वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही, असे देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

राजकारणात राजकीय भूमिका घेत असताना, कधी कधी असे वळण येतात, जेव्हा माणसाला एखाद वेळेस वेगळा विचार करावा लागतो. राष्ट्रवादी पक्षाची 1999 पासून स्थापना झाली. त्यावेळेस आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो. शरद पवारांना साथ देण्याचा माझ्या सारख्या अनेक लोकांनी निर्णय घेतल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

वर्षानुवर्षे पदावर राहिलेल्यांनी विदर्भात आणि वर्धा जिल्ह्यात पक्षाचा फार विस्तार केला नाही असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला. तसेच विदर्भात काही जुने लोक सोडली तर, अजूनही 90 टक्के लोक राष्ट्रवादीत होते ते आमच्यासोबत कार्यात आहे, यामुळे विदर्भात पक्ष वाढवण गरजेचं असल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा :Video :”सनातन धर्म संपवायचा”, उदयनिधी स्टॅलिनचे वादग्रस्त विधान काय?

राष्ट्रवादीकडून विदर्भात हवं तितकं लक्ष देण्यात येत नव्हतं ही शोकांतिका आहे, अनेक वर्ष एक जागा घेऊन समाधान मानत होतो. अशा प्रकरणामुळे वारंवार ती जागा पडायची, यामुळे चांगल्या लोकांना संधी मिळाली नाही, असे पटेल यांनी म्हटले आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात चांगली बांधणी करून पक्षांचा विस्तार करणार असल्याचे निर्धार प्रफुल पटेल यांनी बोलून दाखवला.

हे वाचलं का?

    follow whatsapp