अग्निपथ योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशात वाद सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली असून जाळपोळही झाली आहे.
Narendra Modi
Narendra ModiMumbai Tak

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून (Agnipath Scheme) देशात वाद सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली असून जाळपोळही झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज बेंगळुरूला गेले असता मोदींनी या योजनेचे नाव न घेता तरुणांना मोठा संदेश दिला आहे. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारने अंतराळ आणि संरक्षण क्षेत्र तरुणांसाठी खुले केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की केवळ सुधारणेचा मार्गच आपल्याला नवीन ध्येयांकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक दशकांपासून सरकारची मक्तेदारी असलेली संरक्षण आणि अवकाश क्षेत्रे आम्ही तरुणांसाठी खुली केली आहेत. ड्रोनपासून ते इतर तंत्रज्ञानापर्यंत आम्ही तरुणांना काम करण्याची संधी देत ​​आहोत. सरकारने तयार केलेल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामध्ये आम्ही तरुणांना कल्पना देण्यास तसेच त्यांचे इनपुट देण्यास सांगत आहोत.

उपक्रम सरकारी असो की खाजगी ती देशाची संपत्ती आहे. त्यामुळे दोन्ही उपक्रमांना सारखी वागणूक दिली पाहिजे यावर नरेंद्र मोदींनी भर दिला आहे. गेल्या 8 वर्षांत 100 अब्ज डॉलरहून अधिक कंपन्या निर्माण झाल्या, ज्यामध्ये दर महिन्याला नवीन कंपन्या जोडल्या जात असल्याबद्दलही मोदींनी आनंद व्यक्त केला. भारत स्टार्ट अप्सच्या जगात वेगाने काम करत आहे आणि आतापर्यंत हजारो कोटींचा व्यवसाय केल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले आहे.

पंतप्रधान कर्नाटक दौऱ्यावर होते. यामध्ये त्यांनी सुमारे २७ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यांनी बेंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली आहे, तर दुसरीकडे बीआर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (BASE) चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की सरकार रेल्वे, रस्ते, मेट्रो, अंडरपास, उड्डाणपूल, बेंगळुरूमधील ट्राफीकची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आमचे सरकार बंगळुरूच्या उपनगरी भागांना रस्त्याने जोडण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मोदी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in