शिंदे, फडणवीस, मी 4 वेळा एकत्र; उगाचं वाटायचं एकावर एक फ्री आहे : राज ठाकरेंची फटकेबाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागील काही दिवसांपासून सातत्याने भेटीगाठी होत आहेत. कधी गणपती निमित्त, कधी राज्यातील प्रश्नांनिमित्त तर कधी कार्यक्रमानिमित्त. मनसेच्या दीपोत्सवसारख्या कार्यक्रमात शिंदे – फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत मंचावर उपस्थिती लावली होती.

यामुळे भविष्यकाळात बाळासाहेबांची शिवसेना-भाजप-मनसे महायुती होणार का? अशा चर्चा होत असतात. अशातच आजही एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या १२ हजार ५०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी या वाढत्या भेटीगाठींवर एक मिश्कील टिप्पणी केली.

राज ठाकरे म्हणाले, आताच देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला हजेरी लावून गेले. मुख्यमंत्रीही येऊन गेले. मागील काही दिवसांत आमचे दोन-चार कार्यक्रम सोबत झाले. त्यामुळे कार्यक्रमाला यावं की नाही या संभ्रमात होतो. कारण उगाच लोकांना वाटायचं की एकवर एक फ्री मिळतायत. पण प्रशांतसाठी आलो. राज ठाकरे यांनी अशी मिश्कील टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठींवर फडणवीसांचेही भाष्य :

राज ठाकरे यांच्यासोबतच्या वाढत्या भेटीगाठींवर देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं. शनिवारी रात्री इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरे आमचे जुने मित्र आहेत. एकवेळ होता जेव्हा राज ठाकरे यांचे राजकारण खूपच संकुचित होते. ते केवळ ‘मराठी’ याच मुद्द्यावर भाष्य करायचे. महाराष्ट्रात मराठीबद्दल बोलल पाहिजेच. यात वादच नाही. पण मराठीसोबतच इतर भाषिकांचाही सन्मान व्हायला हवा. देशात भाषेच्या आधारावर कुठेही भेदभाव व्हायला नको, हे आमचं मत होतं.

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी केवळ मराठी भाषेचा मुद्दा सोडून त्यांनी व्यापक हिंदुत्व स्वीकारलं आहे. हिंदुत्वाबद्दल आता ते बोलतात. त्यामुळे हिंदुत्व हा दुवा आहेच. पण मी यापूर्वी देखील स्पष्ट केलं आहे की, आमची युतीबाबत बोलणी झालेली आहे किंवा बोलणी सुरु आहे. हा पण सध्या आमचे हिंदुत्वाचे विचार जुळतात आणि या विचारांची देवाण-घेवाण सुरु आहेत. आता महायुतीमध्ये राज ठाकरे येणार की नाही हे याबद्दल आताच भाष्य करणं योग्य होणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT