Raj Thackeray: अयोध्या दौरा राज ठाकरेंचा पण जुंपली मात्र भाजपमध्येच!

मुंबई तक

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजप खासदारांमध्येच संघर्ष होणार की काय असंच एकूण राजकीय वातावरण पाहायला मिळत आहे. कारण, भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे तर दुसऱ्या खासदाराने राज ठाकरे यांचं स्वागत करू असं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे भाजपमध्येच मतभेद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजप खासदारांमध्येच संघर्ष होणार की काय असंच एकूण राजकीय वातावरण पाहायला मिळत आहे. कारण, भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे तर दुसऱ्या खासदाराने राज ठाकरे यांचं स्वागत करू असं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे भाजपमध्येच मतभेद झाल्याचं समोर आलं आहे.

‘राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातल्या लोकांची माफी मागावी मग अयोध्येत पाय ठेवावा.’ असं भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग वक्तव्य केलं आहे आणि ते त्यावर ठामही आहेत. तर, दुसरीकडे फैजाबादचे भाजपचे खासदार लल्लू सिंग यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे.

लल्लू सिंग यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दलचं आपलं मत ट्विटरवरुन जाहीर केलं आहे. लल्लू सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की,

‘हनुमानजींच्या कृपेने अयोध्येत प्रभू श्रीरामाला जो कोणी शरण जाईल. तर त्याचे स्वागतच आहे. राज ठाकरे जी यांना मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सद्बुद्धी द्यावी, जेणेकरून त्यांचे आणि महाराष्ट्राचे कल्याण होऊ शकेल अशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचरणी प्रार्थना आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp