Devendra Fadnavis: 'पहाटेच्या शपथविधीचं सत्य..', फडणवीस काय म्हणाले? - Mumbai Tak - rest of the early morning swearing in truth will come out soon see what devendra fadnavis said - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Devendra Fadnavis: ‘पहाटेच्या शपथविधीचं सत्य..’, फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis has now reacted to Sharad Pawar’s statement: अहमदनगर: ‘हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धच सत्य बाहेर आलं आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल.’ असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी अहमदनगर […]

Devendra Fadnavis has now reacted to Sharad Pawar’s statement: अहमदनगर: ‘हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धच सत्य बाहेर आलं आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल.’ असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील लोणीमध्ये केलं आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीबाबत काल (22 फेब्रुवार) जे वक्तव्य केलं त्यावरच आता फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (rest of the early morning swearing in truth will come out soon see what devendra fadnavis said)

पहाटेच्या शपधविधीबाबत शरद पवार काय म्हणालेले?

पुणे आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काल पुण्यात आले होते. तेव्हा आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं.

पवार म्हणालेले की, ‘2019 मध्ये सरकार बनविण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की, राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय झालं हे तुम्ही पाहिलं असेल.’

Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!

‘असं आहे की, याविषयी बोलायची आवश्यकता काय? काही गोष्टी या समजणाऱ्यांना समजतात. आता मी सरळ सांगितलं की, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?’

‘राष्ट्रपती राजवट काढावी असं नाही.. तर निघाली. असं आहे की, महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. मध्यंतरी एका गृहस्थाने सांगितलं की, महाराष्ट्रात काही झालं तरी एका व्यक्तीचं नाव घेतलं जातं. तेव्हा त्यांनी उदाहरण दिलं की, लातूरला भूकंप झाला त्याचंही कारण अबक… ही व्यक्ती होती. त्यामुळे ठीक आहे. त्यामुळे मी जे सांगितलं.. ते समजणाऱ्यांना समजतं.’ असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं.

पहाटेच्या शपथविधीमागे पवारांचा हात: फडणवीस

2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवारांचाच हात होता असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

2019 साली निवडणूक निकालानंतर जे आकडे समोर आले ते पाहून उद्धव ठाकरेंनी लागलीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा सुरू केलेली, त्यांची चर्चा पुढे जात होती. पण त्याचवेळी आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, आपण सरकार तयार करुया.’

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबद्दल
पवारांनीच केला मोठा गौप्यस्फोट

‘राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवार यांच्याशीच चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या होत्या. पण त्या ठरल्यानंतर गोष्टी कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे.’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आता या सगळ्या प्रकरणाबाबत पुन्हा वारंवार नवे दावे-प्रतिदावे समोर येत आहेत.

स्वरा भास्कर बनली आई , मुलीला दिला जन्म… Team India विश्वचषक जिंकण्याची शक्यता, कारण आहे खूप खास! तुमचीही प्रेमात उडालीये झोप? कारण… परिणीती, कियारा, आलिया… लग्नानंतर अभिनेत्रींचे व्हायरल लुक! राजेशाही लग्नातही परिणीतीच्या पायात दिसले स्वस्त सँडल, किंमत बघून विश्वास बसणार नाही VIDEO: iPhone 15 साठी तुफान मारहाण, दुकानात नेमकं काय घडलं? Parineeti Chopra निघाली सासरी, राघव चड्ढांसोबतचे व्हायरल Photo भारतातील ‘ही’ 7 पर्यटन स्थळं, परदेशी स्थळांनाही टाकतात मागे! कपल्ससाठी पुण्यातील जपानी शैलीचं बेस्ट गार्डन… जे मैत्रीचं आहे खास प्रतिक! Raghav-Parineeti यांचा शाही विवाह! पाहिलेत का खास फोटो? सर्पाच्या जोडीचा चिमुकल्यांवर प्राणघातक हल्ला! अखेर… डोक्यावर फेटा, काळा चष्मा… राघव चड्ढांचा रॉयल वेडिंग लुक! 6,6,6,6.. सूर्याने रचला इतिहास, कोहलीचाही मोडला ‘तो’ विक्रम! Premanand Maharaj : ‘या’ 2 गोष्टी करा… विघ्न जातील अन् येतील चांगले दिवस! Jasprit Bumrah ला दुसऱ्या वनडेत का खेळवलं नाही? Katrina Kaif प्रेग्नेंट? सगळीकडे विकी एकटाच का फिरतो? Jio air fiber vs Jio fiber : तुमच्यासाठी कोणतं कनेक्शन फायद्याचं? Alibaug मधील ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर! तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचे स्पीड कमी झाले असेल तर हे पर्याय निवडा घरच्या घरी बनवा तुमच्या आवडीचं चीज! सोपी आहे रेसिपी…