संजय राऊत : “नेहरूंना ईडी, सीबीआयची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल”
नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आलंय. ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या प्रकरणात नोटीस बजावली आहे. ईडीच्या या नोटिशीवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सरकारवर अप्रत्यक्षपणे बाण डागले आहेत. संजय राऊतांनी रोखठोक सदरातून या प्रकरणावर भाष्य करताना मोदी-शाह यांना अप्रत्यक्षपणे राजकारणातील व्यापारी असा टोला लगावला आहे. […]
ADVERTISEMENT

नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आलंय. ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या प्रकरणात नोटीस बजावली आहे. ईडीच्या या नोटिशीवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सरकारवर अप्रत्यक्षपणे बाण डागले आहेत.
संजय राऊतांनी रोखठोक सदरातून या प्रकरणावर भाष्य करताना मोदी-शाह यांना अप्रत्यक्षपणे राजकारणातील व्यापारी असा टोला लगावला आहे.
संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये म्हणतात…
“नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने सोनिया व राहुल गांधी यांना नोटीस बजावली. आता या प्रकरणात खुद्द पंडित नेहरूंनाच नोटीस बजावून त्यांच्या स्मारकावर ती चिकटवली तरी आश्चर्य वाटायला नको! हेराल्ड म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचे हत्यार होते. नेहरूंनी ते निर्माण केलं. ती फक्त संपत्ती नव्हती. राजकारणातील सध्याच्या व्यापाऱ्यांना हे कधी समजणार?.”