शिंदे गटाने शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय नेलं टेंभी नाक्यावर; काय आहे प्रकरण?

मुंबई तक

४० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी बंड करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला झटका दिला. आमदारांच्या पाठबळावर भाजपशी हातमिळवणी करत शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त करत थेट केद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं. आता शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका दिलाय. आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणाऱ्या शिंदेंनी शिवसेना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

४० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी बंड करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला झटका दिला. आमदारांच्या पाठबळावर भाजपशी हातमिळवणी करत शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त करत थेट केद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं. आता शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका दिलाय. आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणाऱ्या शिंदेंनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदललाय.

शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून एकनाथ शिंदेंची शिवसेना मुख्यनेता म्हणून निवड केली. इतकंच नाही, तर त्यानंतर प्रतिशिवसेना भवन उभारण्याचं विधानही शिंदे गटाकडून करण्यात आलं होतं. या चर्चा शांत होत नाही, तेच आता शिंदेंनी शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलून टाकलाय.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात हलवलं?

शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय दादरमधील शिवसेना भवनात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या सचिवांकडून केल्या जाणाऱ्या नियुक्त्यांच्या पत्रावरही हाच पत्ता असतो. मात्र, शिंदे गटाच्या पत्रावर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं ठिकाणचं बदलण्यात आलंय. शिवसेना मुख्यनेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या नियुक्तीच्या पत्रावर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता दादर नव्हे, तर ठाण्यातील देण्यात आलाय. त्यामुळे शिंदे गटाकडून मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात नेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झालीये.

शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्लान काय? जयंत पाटील यांनी उघड सांगितला

हे वाचलं का?

    follow whatsapp